esakal | विनाविलंब माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करा
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon

Jalgaon : विनाविलंब माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी माहिती अधिकार अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेली माहिती विभाग प्रमुखांनी आपापल्या विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून ती नियमितपणे अद्ययावत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मंगळवारी (ता. २८) दिल्या.

माहिती अधिकार दिवसानिमित्त मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, प्रसाद मते, किरण सावंत- पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, तहसीलदार जितेंद्र कुवर, पंकज लोखंडे, साहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो, तर ६ ते १२ ऑक्टोबर हा कालावधी माहिती अधिकार सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपापल्या कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे. सप्ताहानिमित्त शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांसह अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये माहिती अधिकार अधिनियमावर आधारित वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमालेचे आयोजन करावे.

loading image
go to top