

Jalgaon Ganeshotsav
esakal
जळगाव: जळगाव शहर महापालिकेच्या वतीने यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या ‘मानाचा गणपती’ येत्या १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात विराजमान होणार आहे. गणेशोत्सवाचे नियोजन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी आयुक्त आदित्य जिवने यांच्या अध्यक्षतेखाली १८ सदस्यीय उच्चस्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली आहे.