अकरा तालुक्यांत नवे रुग्ण दहाच्या आत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon corona

अकरा तालुक्यांत नवे रुग्ण दहाच्या आत

जळगाव : जिल्ह्यातील अकरा तालुक्यांत नव्या रुग्णांची दिवसभरातील संख्या दहाच्या आत नोंदली गेली. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार १५८ नवे बाधित आढळून आले, तर ६२९ जणांना दिवसभरात डिस्चार्ज मिळाला. (coronavirus-update-no-more-ten-patient-elevan-taluka)

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग (Jalgaon coronavirus update) आटोक्यात येत असल्याची चिन्हे आहेत. एप्रिल व मे महिन्यातील लॉकडाऊनचे (Lockdown) सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. शुक्रवारी साडे आठ हजार चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. पैकी १५८ नवे बाधित आढळन आले असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ४० हजार ६०४ झाली आहे. दिवसभरात नव्या बाधितांपेक्षा चौपट (Coronavirus) म्हणजे तब्बल ६२९ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३४ हजार २२७पर्यंत पोचला आहे. गेल्या २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या २५४८वर पोचली आहे.

हेही वाचा: सव्वा महिना उपचार; ऑक्सीजन लेव्हल ७५ असताना कोरोनाबाधित महिलेचे वाचले प्राण

गंभीर रुग्ण घटले

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही बऱ्यापैकी वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या कमी झाली आहे. लक्षणे असलेले केवळ ८१३ रुग्ण असून लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ३ हजार १६, म्हणजे एकूण सक्रिय रुगण आता ४ हजारांच्या आत आहेत. पैकी ४३६ ऑक्सिजनवरील व २२२ आयसीयूतील असे गंभीर रुग्ण आहेत.

असे आढळले रुग्ण

जिल्ह्यातील १५ पैकी ११ तालुक्यांमध्ये शुक्रवारी दहापेक्षा कमी रुग्णसंख्येची नोंद झाली.

असे आढळले रुग्ण : जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ ७, अमळनेर १, चोपडा २, पाचोरा४, भडगाव ७, यावल ४, एरंडोल २०, जामनेर ६, पारोळा २, चाळीसगाव ४५, मुक्ताईनगर ४, बोदवड १३.

टॅग्स :CoronavirusJalgaon