कृषी केंद्र फोडले अन्‌ मालक धडकला..अठरा हजार घेत चेारटे पसार ; सीसीटीव्हीत चोर कैद

कृषी केंद्राच्या
कृषी केंद्राच्या
Updated on: 

जळगाव,  शहरातील चित्रा चौकातील चौरसिया कृषी केंद्र अज्ञात चार चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने फोडून गल्ल्यातील १८ हजार रूपयांची रोकड लंपास केली. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास कृषीकेंद्र फोडल्यानंतर येथे झोपलेल्या वृद्ध वाचमनने मालकाला फोन केल्यावर दुचाकीने मालकही दुकनावर पेाचले. मालका देखत चेारटे रोकड घेवून पसार झाले. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शहर पेालिस संशयीतांचा शोध घेत आहे. 

बळीरामपेठ येथील रहिवासी विजयकुमार रमेश चौरसिया (वय-47) यांचे शहरातील चित्राचौकात मोक्याच्या ठिकाणी चौरसिया कृषी केंद्र नावाचे दुकान आहे. याठिकाणी कृषी किटकनाशके आदींची विक्री केली जाते. दुकानाला तीन शटर आहेत. सोमवार(ता.२४)आज पहाटे ५ः१५ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवर आलेल्या चार चोरट्यांनी दुकानासमोर वाहने उभी केली. काही वेळ दुकानाच्या पायरीजवळ बसले. आजूबाजू टेहाळणी केली, त्यानंतर चौघांपैकी दोघांनी कटर आणि टॉमीच्या मदतीने दुकानाचे मधले शटर उचकावून दुकानातील गल्ल्या स्क्रृ ड्रायव्हरने तोडून आत ठेवलेले अंदाजे १७ ते १८ हजार रूपयांची रोकड लंपास केली. हा सर्व प्रकार दुकानाच्या दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

वृद्धाला पिटाळले अन्‌
कृषी केंद्राच्या पायऱ्यांवर कमलेश ठाकुर ( वय-६०) हा वयोवृद्ध झोपलेला होता. चारही चोरट्यांनी वाहन थांबवल्यावर वृध्दाने त्यांना विचारणा केली असता. चोरट्यांनी त्याला दम देत पिटाळून लावले. तेथून पुढे गेल्यावर थोड्याच वेळात या कृषी केंद्राचे दुकान मालक चौरसिया याना फोन लावून चोरी होत असल्याची माहिती दिली. विजय चौरसिया तत्काळ दुकानाजवळ आले. दुकान मालक आल्याचे पाहून चारही भामटे दुकानावर कटर, टॉमी आणि लाल रंगाची बॅग घटनास्थळी सोडून पसार झाले.

दरम्यान, चौरसिया कृषी केंद्रासमोर कृष्णा ईलेक्ट्रीक दुकानही चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. दुकानाचे एक कुलूप तोडल्याचे दिसून आले. तसेच सराफ बाजारात काही दुकानाचे कुलूप तोडले असल्याचे बोलले जात होते. चोरी झाल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पाहणी केली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Four Suspects Held by Jalgaon Police
Nandurbar bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com