esakal | नगरसेविकेच्या बनवाट स्टॅम्पच्या अधारे ‘आधार’चा धंदा
sakal

बोलून बातमी शोधा

नगरसेविकेच्या बनवाट स्टॅम्पच्या अधारे ‘आधार’चा धंदा

नगरसेविकेच्या बनवाट स्टॅम्पच्या अधारे ‘आधार’चा धंदा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : मेहरूणमधील नगरसेविकेच्या (Corporators) नावाचा बनावट स्टॅम्प (Fake stamp) तयार करून आधारकार्ड नवीन व अपडेट करून देण्याचा प्रकार सोमवारी (ता. ५) दुपारी उघडकीला आला. आपल्या नावाचे शिक्के वापरले जात असल्याची माहिती कळताच नगरसेविकेच्या मुलासह नगरसेवक प्रशांत नाईक यांनी संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय गाठत हा प्रकार सांगितला व तिघा भामट्यांना शहर पोलिसांच्या (Jalgaon city police) स्वाधीन केले. अमर येवले (रा. खोटेनगर) व इरफान शेख (रा. मलिकनगर), पीयूष नवाल (रा. रायपूर फाटा, कुसुंबा) अशी संशयितांची नावे असून, प्रभाग १५ च्या नगरसेविका शबानाबी खाटीक यांच्या नावाने हा बनावट स्टॅम्प बनविला आहे.

(corporators name fake stamp use police arrest two suspects)

हेही वाचा: सततच्या मोबाईल वेडाने अनेकांची उडाली झोप!

जळगाव रेल्वेस्थानक परिसरातील संजय गांधी निराधार योजना कार्यालयात नगरसेविका शबानाबी खाटिक यांच्या नावाने बनावट स्टॅम्पद्वारे आधारकार्ड तयार करून देणे व अपडेट करणे आणि इतर दाखले दिले जात होते. मेहरूण परिसरातील नईम बशीर खाटीक सकाळी या कार्यालयात आले असता, त्यांना आपल्या प्रभागाच्या नगरसेविकेचा शिक्का वापरला जात असल्याचे आढळले. त्यांनी नगरसेविका खाटीक यांचा मुलगा सलमान याला भ्रमणध्वनीवरून याबाबत विचारणा केली. आपण कोणालाही स्टॅम्प तयार करून दिला नसल्याचे सलमान याने सांगितले. नंतर सलमान खाटीक, नगरसेवक प्रशांत नाईक यांनी थेट संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय गाठले. तेथे अमर येवले व इरफान शेख (रा. मलिकनगर) नगरसेविका खाटीक यांच्या बनावट स्टॅम्पचा वापर करीत असल्याचे आढळले. त्यावरून खाटीक यांनी दोघांना शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांना दोघांनी हा स्टॅम्प पीयूष नवाल याच्याकडून आणल्याचे सांगितले. याबाबत सलमान खाटीक याने दिलेल्या फिर्यादीवरून अमर येवले, इरफान शेख व पीयूष नवाल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अरुण सोनार तपास करीत आहेत.

हेही वाचा: जळगाव जिल्हा बँकेत पाच हजार विद्यार्थ्यांची खाती उघडली!

अनेक दिवसांपासून वापर
पोलिसांनी अटक केलेले संशयित अनेक दिवसांपासून शिक्का आणि नगरसेविकेची बनावट स्वाक्षरी वापरत असल्याची बाब समोर आली आहे. या दोघांनी कोणकोणते दस्तऐवज तयार केले याची पोलिस कसून चौकशी करीत आहे.

loading image