फळविक्रेत्‍यांकडून पोलिसास मारहाण; अकरानंतर बाजार बंद करण्याचे कारण

फळविक्रेत्‍यांकडून पोलिसास मारहाण; अकरानंतर बाजार बंद करण्याचे कारण
police beaten fruit sellers
police beaten fruit sellerssakal

फत्तेपूर (जळगाव) : सकाळी भरलेला बाजार शासकिय नियमामुसार (Jalgaon lockdown) बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिस हवालदारास मुजोर पाच फळविक्रेत्यांनी मारहाण (Police beaten) केली. सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या सुमारास सदर घटना घडली. पोलिसांनी एकास अटक केली असून चार जण गर्दीचा फायदा घेऊन पळून गेले. या घटनेमुळे परिसरात शांतता पसरली आहे. (fattepur-corona-lockdown-police- beaten-fruit-sellers)

police beaten fruit sellers
आशादायक..जिल्हा कोविड रुग्णालयातील १७० बेड रिकामे

पोलिस कर्मचारी अनिल सुरवाडे हे बाजारात अकरानंतर दुकाने बंद करा सांगण्यासाठी सहकारी दिनेश मारवडकर, होमगार्ड यांच्यासह गेले होते. या दरम्‍यान अरशद युसूफ पठाण, युसूफ खाँ शब्बीर खाँ पठाण, मेहमूद खॉ शब्बीर खाँ पठाण, एजाज पठाण, मोहसिन मेहमूद पठाण हे सर्वजण अंगावर धावून आले व मारहाण केली. सुरवाडे यांच्या डाव्या हाताच्या दंडावर जखम झाली आहे. घडलेल्या प्रकाराबद्दल पहूरचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना कळविले असता ताबडतोब फौजफाटा घेवून घटनास्थळ गाठले. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिसावर हल्‍ला करणाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतिक्रमण काढण्याची कारवाई

सदर घटनेत पोलिसांनी अरशद युसूफ पठाण यास अटक केलेली असून अन्य चार जण फरार आहेत. यानंतर दुपारी पोलिस बंदोबस्तात बसस्थानक परीसरात असलेले अतिक्रमण काढण्यात आले. फत्तेपूरकरांनी पोलिसास झालेल्या मारहाणीचा निषेध केलेला आहे. पुढील तपास पहूर व फत्तेपूरचे पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com