esakal | बापरे..मध्यरात्री अंथरूणात शिरला ‘साप’; महिलेच्‍या हाताला झाला स्‍पर्श
sakal

बोलून बातमी शोधा

snake

बापरे..मध्यरात्री अंथरूणात शिरला ‘साप’; महिलेच्‍या हाताला झाला स्‍पर्श

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : वेळ रात्री तीनची.. सर्वांचीच साखर झोपेची वेळ.. हरिविठ्ठलनगर पुढील व्यंकटेशनगरातील भावसार कुटुंबीय असेच साखर झोपेत असतांना ‘मण्यार’ नावाचा अति विषारी सर्प (Manyar snake home) काळ बनून त्यांच्या घरात वावरत होता. घरातील एका महिलेचा हाताला सापाचा सर्प होताच ती खडबडून जागे झाली. सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवून सर्पमित्राला फोन लावला. सर्पमित्रानेही रात्री येवून त्याने ’मण्यार’ला पकडून भावसार कुटूंबियांचे प्राण वाचविले. (night-Bhavsar-family-sleep-home-and-snake-coat)

व्यंकटेशनगरातील भावसार कुटुंबीयांपैकी अरुणा भावसार ही महिला नातवंडे अक्षरा, हर्ष भावसार यांना घेऊन नेहमी प्रमाणे जमिनीवर झोपली होती. अंथरूणाच्या उबदार वातावरणाकडे आकर्षित होऊन ‘मण्यार’ महिलेच्या अंथरुणात शिरला. त्या सर्पाचा स्पर्श महिलेला झाला. काहीतरी वळवळतय म्हणून हात झटकला आणि साक्षात काळ समोर दिसला.

हेही वाचा: Video : अन्‌ एरंडोलमध्‍येही अवतरला ‘चुंबकमॅन’; बातमी वाचून केला प्रयोग

कुटुंब भयभीत

सगळे कुटुंबीय भयभीत झाले. कुणाला चावला असेल का? नातवंडाना चावला असेल का? काही होणार तर नाही ना?या चिंतेत असतांना घरातील जिन्याकडे जातांना साप दृष्टीस पडला. अशोक भावसार यांनी तात्काळ वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र राजेश विठ्ठल सोनवणे यांना कॉल केला. परिस्थिती जाणून घेत सेवाधर्म म्हणून सोनवणे यांनी कुटुंबाला धीर दिला. पलंगावर सुरक्षित जागेवर बसण्याचा सल्ला देत तात्काळ धाव घेतली.

साडेतीन फुटी ‘मण्यार’

सर्पमित्र सोनवणे यांनी परिस्थितीचे अवलोकन केले असता आणि रात्रीची वेळ बघता सदर सर्प मण्यार जातीचा अतिविषारी निशाचर साप घरातच असावा असा अंदाज बांधला. २० मिनिटे शोध घेतल्यानंतर सुमारे साडेतीन फुटाचा मण्यार पकडण्यात यश आले. आणि भयभीत कुटुंबीय भयमुक्त झाले. आमच्यावर काळ आला होता पण तुम्ही वेळ येऊ दिली नाही. सर्पमित्र देवदूता सारखे धावून आलात असे म्हणत भावसार कुटुंबीयांनी सोनवणे व संस्थेचे आभार मानले.

loading image
go to top