esakal | Video : अन्‌ एरंडोलमध्‍येही अवतरला ‘चुंबकमॅन’; बातमी वाचून केला प्रयोग
sakal

बोलून बातमी शोधा

magnet man

Video : अन्‌ एरंडोलमध्‍येही अवतरला ‘चुंबकमॅन’; बातमी वाचून केला प्रयोग

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : कोरोनाची लस (Corona vaccine) घेतल्यानंतर अंगाला नाणी तसेच स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार नाशिक येथे घडला होता. यानंतर ठिकठिकाणी असे प्रकार समोर येत आहे. यातच आता जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील एका व्यक्तीने (Magnet man) देखील हा प्रयोग करून पाहिला असता त्याच्या अंगाला नाणी व स्टीलच्या वस्तू चिटकल्या. (jalgaon-corona-vaccination-erandol-magnet-man-video-viral)

कोरोनाची लस घेतल्‍यामुळे अंगाला चुंबकत्‍व येत असल्‍याचे म्‍हटले जात आहे. नाशिक येथे असा प्रकार घडल्‍यानंतर ठिकठिकाणी असे प्रकार होत आहेत. लस घेणारा प्रत्‍येक जण हा प्रयोग करून पाहत आहे. परंतु, लस घेतल्‍यानंतर हा प्रकार होत नसल्‍याने प्रत्‍येकाच्‍या अंगाला चमचे चिकटत नसल्‍याचे देखील समोर आले आहे.

हेही वाचा: ऑगस्‍टमध्‍ये तिसरी लाट येण्याची शक्‍यता; दुसरी लाट ओसरण्यास दहा दिवसांचा अवधी

प्रयोग करुन पाहिला अन्‌

एरंडोल येथील पी. जी. पाटील या व्यक्तीने हा प्रयोग करून पाहिला. एरंडोल शहरातील विद्यानगर भागातील रहिवासी असलेले पाटील हे खडके खुर्द येथील महेंद्रसिंग पाटील माध्यमिक विद्यालयात लिपीक आहेत. सकाळी नाश्ता करण्यासाठी घरातील स्वयंपाकगृहात गेले असता तेथे असलेले स्टीलचे चमचे सहज अंगाला लावून पाहिले. नाशिक येथील घडलेल्या घटनेबाबत त्‍यांना माहिती असल्याने त्यांनी अंगाला स्टीलच्या वस्तू चिटकतात का? म्हणून प्रयोग करून पाहिला तर त्यांच्या अंगाला स्टीलचा चमचा चिटकला. कुतूहल निर्माण झाल्याने त्यांनी एक रुपया, दोन रुपयांची नाणी अंगाला चिटकवून पाहिले. तर ते पण चिटकले.

अंघोळ करून पाहिली

अंगाला चमचे चिकटतात का? हा प्रयोग त्‍यांनी सहज करून पाहिला असता ते चिकटले. मात्र घामामुळे हे चकटत असावेत म्‍हणून त्‍यांनी अंघोक केली. यानंतर पुन्‍हा चमचे व नाणे अंगाला चिकटवून पाहिले असताना ते चिकटले. यानंतर ते थोडे अंतर चालून पाहिले असताना चमचे किंवा नाणी पडले नसल्‍याचे पाटील सांगतात.

त्‍यांचेही दोन्ही डोस

पी. जी. पाटील यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यांनी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस ९ मार्चला तर दुसरा डोस ५ एप्रिलला घेतला आहे. दरम्यान, लस घेतल्यानंतर खरोखर शरीरात काही बदल होतात का? अंगाला नाणी व स्टीलच्या वस्तू चिटकत असल्याची बाब कितपत खरी आहे; याबाबत वैज्ञानिक कारण समोर यायला हवे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

loading image
go to top