पाच रुपये भिक्षा देऊन बालिकेवर अत्याचाराची कबुली ; सात दिवस कोठडी

रईस शेख
रविवार, 12 जुलै 2020

संशयित सौरव वासुदेव खिर्डीकर याला ताब्यात घेतल्यावर त्याने सुरुवातीला टाळाटाळ केली. नंतर चिमुरड्यांनी त्याच्या तोंडावर त्याची ओळख पटवल्यावर मात्र, तो खजील झाला. मुलीला पाच रुपये भिक्षा म्हणून दिले..नंतर खाऊ देतो असे सांगत सोबत गोलाणीत आणले अशी स्पष्ट कबुली वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष संशयिताने दिल्याचे तपास पथकाने माहिती देताना सांगितले

जळगाव, ः- शहरातील गोलाणी व्यापारी संकुलाच्या शौचालयात दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला होता. गुन्हेशाखेच्या पथकाने संशयित सौरवनेखिर्डीकर या संशयिताला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला सात दिवस पोलीस केाठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे. संशयित सौरभने भिक्षा म्हणून पीडिताला पाच रुपये दिले आणि खायला देतो..सोबत चल असे म्हणून घेऊन गेल्याची कबुली वरीष्ठ अधीकाऱ्यांसह तपासाधिकाऱ्यांसमक्ष दिली आहे. 

गोलाणी व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयात शुक्रवार(ता.१०)भर दिवसा दहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आला. पिडिता भटक्या कुटुंबातील असून कुणाला माहितही पडणार नाही म्हणून संशयित सौरवने गुन्हा घडल्यानंतर पळ काढला आणि तो, निवांत होता. संपूर्ण पेालिस दलातील मातब्बर अधिकारी कर्मचारी तपासात होते. स्केच काढण्यात येऊन सीसीटीव्ही फुटेज संकलित झाले..तरी संशयिताचा नाव पत्ता मिळत नव्हता मात्र, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रेाहोम यांच्या पथकातील शरद भालेराव, अनिल इंगळे, संतोष मायकल अशांनी उलट्या दिशेने तपासाला सुरुवात केली. रेल्वेस्थानक परिसरातील भीक मागणाऱ्या व कचरा वेचणाऱ्या लहानग्या पेारांना संपर्क साधला..स्केच दाखवून आम्ही मुलीला ओळखतो इथवर बोलते केले. विश्‍वासात घेतल्यावर त्यांनी संपूर्ण घटनाक्रम आखोदेखी सांगून टाकल्यानंतर संशयित सौरव वासुदेव खिर्डीकर याचे नाव निष्पन्न होऊन त्याला अटक करण्यात आली. आज सौरभला जिल्‍हा न्यायालयात न्या. आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात हजर केला. न्यायालयात तपासातील बाबी आणि आवश्‍यक पुरावे संकलनासाठी सहाय्यक निरीक्षक गणेश बुवा यांनी पोलीस  कोठडीची मागणी केली. न्यायालयाने संशयिताला ७ दिवस पोलीस केाठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.

गुन्ह्याची कबुली
संशयित सौरव वासुदेव खिर्डीकर याला ताब्यात घेतल्यावर त्याने सुरुवातीला टाळाटाळ केली. नंतर चिमुरड्यांनी त्याच्या तोंडावर त्याची ओळख पटवल्यावर मात्र, तो खजील झाला. मुलीला पाच रुपये भिक्षा म्हणून दिले..नंतर खाऊ देतो असे सांगत सोबत गोलाणीत आणले अशी स्पष्ट कबुली वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष संशयिताने दिल्याचे तपास पथकाने माहिती देताना सांगितले.पिडीत बालीकेवर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचाार सुरु आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news; rep on ten year old baby in golani market