चालक जेवत असताना उभा ट्रक चोरट्यांनी गिळला

रईस शेख
रविवार, 12 जुलै 2020

चोपड्यात शनिवारी सकाळी १० वाजता भरलेला ट्रक खाली केला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता जळगावला आहे. जळगाव नाशिक दुसरे भाडे मिळावे आणि जाण्यापूर्वी दोन घास जेवण करावं म्हणून ते, महामार्गावरील ट्रान्सपोर्ट नगरातील खुशी ट्रान्सपोर्ट जवळ ट्रक उभा करून जेवण करण्यासाठी बाजूच्या ठिकाणी गेले. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गाडी जवळ आले, तेव्हा ट्रक लावला त्या ठिकाणाहून गायब झाला होता. बराच शोध घेऊन ट्रक सापडत नाही म्हणून  अफजल खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले.

जळगाव ः युरिया खताची वाहतूक करणारा ट्रक जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातून चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवार ११ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे ट्रक उभा करून ट्रान्सपेार्ट मध्ये  चालक-क्लिनर जेवत असताना चोरट्यांनी उभा ट्रक रस्त्यावरून गायब केला.

नाशिक जिल्‍ह्‍यातील रामोशी वाडा येथील रहिवासी अफझल अब्बु खान (वय-५०) गेल्या पाच वर्षांपासून ट्रक क्रमांक (एमएच ४१ जी ५५३४) वर चालक म्हणून कार्यरत आहेत. मालवाहतूक ट्रक असल्याने मिळेल तसे भाडे घेऊन या जिल्‍ह्‍यातून त्या जिल्ह्यात त्यांचे येणे-जाणे असते. नेहमी प्रमाणे शुक्रवारी(ता १०) रोजी अफजल खान चोपडा येथे युरिया खताची खेप घेऊन नाशिक येथून निघाले हेाते. चोपड्यात शनिवारी (ता.११ )जुलै रोजी सकाळी १० वाजता भरलेला ट्रक खाली केला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता जळगावला आहे. जळगाव नाशिक दुसरे भाडे मिळावे आणि जाण्यापूर्वी दोन घास जेवण करावं म्हणून ते, महामार्गावरील ट्रान्सपोर्ट नगरातील खुशी ट्रान्सपोर्ट जवळ ट्रक उभा करून जेवण करण्यासाठी बाजूच्या ठिकाणी गेले. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गाडी जवळ आले, तेव्हा ट्रक लावला त्या ठिकाणाहून गायब झाला होता. बराच शोध घेऊन ट्रक सापडत नाही म्हणून  अफजल खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. संपूर्ण हकिकत सांगितल्यावर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास आनंदसिंग पाटील करीत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news; The truck was swallowed by thieves while the driver was eating