धावत्या दुचाकीवर गळ्यात अडकली केबल..

रईस शेख
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

रिंगरोडवरील एका ग्राहकांचे कागदपत्र घेण्यासाठी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जात असतांना शहरातील मु.जे.महाविद्यालयजवळ एक लोंबकळत असलेली केबल अंधारामुळे न दिसल्याने थेट मनिषच्या गळ्यात अडकली. केबलचा मनिषला गळफास लागला व दुचाकीवरुन खाली पडून मनिष गंभीर जखमी झाला.

 

जळगाव ः-  काम आटोपून दुचाकीने घरी जात असलेल्या तरूणाच्या गळ्यात लोंबकळत असलेली केबल अडकल्याने तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास मू.जे. महाविद्यालयाजवळ घडली. मनिष चंद्रकांत पांढारकर वय 27 रा. दत्त मंदिराजवळ, वाघ नगर असे जखमी तरुणाचे नाव आहे. घटनेत मनिषच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून धावत्या दुचाकीवरुन खाली पडल्याने हात मोडला आहे. त्याला खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जखमीच्या परिचीताकंडून मिळालेल्या माहिती नुसार मनिष चंद्रकांत पांढारकर (वय-27) रा. दत्त मंदीराजवळ वाघ नगर हा तरूण एसबीआय बँकेच्या थर्ड पार्टीच्या माध्यमातून क्रेडीट कार्डचे काम करतो. दरम्यान रिंगरोडवरील एका ग्राहकांचे कागदपत्र घेण्यासाठी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास जात असतांना शहरातील मु.जे.महाविद्यालयजवळ एक लोंबकळत असलेली केबल अंधारामुळे न दिसल्याने थेट मनिषच्या गळ्यात अडकली. केबलचा मनिषला गळफास लागला व दुचाकीवरुन खाली पडून मनिष गंभीर जखमी झाला. याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांसह मित्रांना मिळाल्यावर घटनास्थळ गाठून जखमी मनिषला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्याच्या डाव्या हाताचे हाड मोडले असून गळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. याबाबत पोलिसात कुठलीह नोंद नाही.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Accident due to a cable hanging on the road