बार बंद नो टेन्शन..जळगावात रस्त्यावर मधुशाला ; पोलिसांची हाताची घडी,एक्साइजचे तोंडावर बोट

Bar closed, no tension .. bar on the street in Jalgaon
Bar closed, no tension .. bar on the street in Jalgaon
Updated on

जळगाव, ः-  मार्च महिन्या पासुन लॉकडाऊन लागले, त्यानंतर थेट जुलै महिन्यातच वाईन शॉप उघडी झाली बियरबार मात्र बंदच आहेत. वाईन शॉपवरुन दारू घ्यायची आणि गल्ल्यांमध्ये, मार्केट मध्ये बसून ती रिचवायची असा सरधोपट कार्यक्रम सद्या मद्यप्रेमींनी चालवला आहे. त्यामुळे शहरात मध्यवर्ती ठिकाणे आणि वाईनशॉप असलेल्या परिसरात रस्त्यावर मयखाने (बियरबार) सजु लागल्याची परिक्षीती निर्माण झाली आहे. 

शासनाला मिळणाऱ्या महसुली उत्पन्नात दारूचा मोठा वाटा आहे.  भारतात कोरोनाचा कहर सरू असताना केंद्र आणि राज्या शासनाने पहिली परवानगी दारू दुकाने उघडण्याची दिली. किरणा मालासाठी नाही इतकी गर्दी दारू घेण्यासाठी दारुड्यांनी केल्याचे यामुळे दिसून आले.  अनलॉक होण्यापूर्वीच राज्यातील वाईन शॉप वेळ मर्यादा ठेवून सुरू करण्यात आलेल्या होत्या. वाईन शॉप सुरु असल्या तरी बियर बार, हॉटेल्स ला अद्याप परवानगी नसल्याने सर्वच बियरबार बंद आहेत. बियर-बार बंद असल्याने पेणाऱ्यांची पुरती पंचायीत झाली होती. त्यावर रस्त्यावरच दारुड्यांनी मोकळे बार उघडून उघड्यावर दारू पेणाऱ्यांची खास ठिकाणे जळगाव शहरात तयार झाली आहेत. कोरेाना पूर्वी केवळ अंडापावच्या गाड्यांवर दारुंड्याची गर्दी होत होती. मात्र आता चक्क गल्ल्याच दारुड्यांच्या नावाने ओळख बनवत आहेत. 

प्रसीद्ध ठिकाणे अशी..
जुने स्टॅण्ड शेजारील लॉटरी गल्ली येथे दिवसभर देशी विदेशी दोन्ही प्रकारचे दारुडे झिंगताना आढळून येतील, त्यांनंतर अशोक सिनेमा टॉकिज गल्ली, अजिंठा चौकातील अंडा-पाव, चिकन लॉऱ्यांचे ठिकाण, प्रभात कॉलनी चौकातील वाईन शॉप गल्ली, शाहुनगर पेालिस लाईन शेजारी, ईच्छादेवी पोलीस चौकी समोरील मैदान अशा मध्यवर्ती ठिकाणी दारुड्यांच्या जत्रा भरलेल्या आढळून येत आहे. 

बारचा ग्राहकही रस्त्यावर
सहा महिन्यापुर्वी रस्त्यावर, अंडालॉरीवर, उघड्यावर दारू पेण्यास लोक घाबरत होते. गर्दी होती मात्र, बार मध्येही रात्री उशिरापर्यंत गर्दी असायची. मार्च पासून बियरबार, हॉटेल्स्‌ बंद आहेत. पेणाऱ्यांना मिळेल तेथे ढोसून ते मोकळे होतात. बार मध्ये अतिरिक्त लागणारा खर्चही लागत नाही. परिणामी येथून पुढे हिच प्रथा कायम राहण्याची शक्यता वाईन शॉप चालकांकडून चवर्तवली जात आहे.  

एक्साईज गप्प..पोलिसांची हाताची घडी
लॉकडाऊन मध्ये राज्यात गाजलेले आर.के.वाईन्स प्रकरण, दारू तस्करीचे इतर गुन्हे दाखल करुन दारू माफियांना जळगाव पोलिसांनी सळोकी, पळो करून सोडले होते. अनलॉक झाल्यानंतर रितसर दारू दुकाने उघडी झाली असून केवळ बार बंद असल्याने रस्त्यावर दारू पेण्याचे प्रमाण वाढले आहे. 
 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com