मोबाईल चित्रण करून देाघांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

रईस शेख
Thursday, 13 August 2020

तेजस दिलीप सोनवणे (वय-२०) याच्यानंतर त्याचा मित्र चेतन पीतांबर सोनार याने मोबाईल चित्रणाद्वारे ब्लॅकमेलिंग करून मुलीवर अत्याचार सुरुच ठेवला होता. घाबरलेल्या मुलीने अनेक वेळा विनवण्या करुनही उपयोग होत नसल्याने तिने बाहेर येणे-जाणे बंद केले होते. तिच्या संपर्कातील मैत्रिणींना तिच्या बद्दल वाईट बोलून तिला त्रास देणे सुरू होते. ती बाहेर दिसताच घाणेरडी शेरे..बाजी करून त्रास दिला जात असल्याने अखेर पिडीतेने घडला प्रकार पालकांना सांगितला.

जळगाव,  ः- इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात ओढून एकाने लैंगिक अत्याचार केले. देाघांच्या पाळतीवर असलेल्या मुलाच्या मित्राने या अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रण करून देाघा भामट्यांनी या मुलीला वर्षभर ब्लॅकमेलिंग करून छळ सुरू केला होता. त्रास असह्य झाल्याने अखेर पिडीतेने घडला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यावर या प्रकरणी शनीपेठ पेालिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पीडिताने पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार, इयत्ता दहावीचे शिक्षण घेणारी पिंकी(काल्पनीक नाव)वर गल्लीतील तेजस दिलीप सोनवणे(वय-२०)याची नजर होती. तिच्याशी मैत्रीकरुन प्रेमाचे नाटक करून भेटीगाठी सुरू झाल्या. २८फेब्रुवारी२०१९ रेाजी दहावीचा निकाल घेण्यासाठी पिंकी शाळेत गेली होती. निकाल घेतल्यानंतर घरी येत असताना तिच्या पाळतीवर असलेल्या तेजस व त्याचा साथीदार चेतन सेानार अशांनी तिला गाठले. तेजस सोनवणे याने तिला दुचाकीवर बसवून कोल्हे हिल्स परिसरात घेऊन गेला. मागोमाग त्याचा मित्र चेतनही धडकला. देाघ एकांतात बसले असताना चेतन पाळतीवर होता. तेजसने मुलीला एका बांधकामाच्या आडोशाला नेऊन अत्याचार केला. याचे संपूर्ण चित्रण चेतन सोनार याने गुच्चूप त्याच्या मोबाईल मध्ये करून घेतले होते.घडल्या प्रकारानंतर पिंकीने तेजस सोनवणे याच्याशी बोलणे बंद केल्यावर चेतन सोनार याने तिच्याशी संपर्क वाढवला. संधी साधून त्यानेही साधारण सहा महिन्यापूर्वी त्याच जागी नेऊन पिडीतेला मोबाईल मध्ये केलेले तिचे चित्रण दाखवून अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. 

देाघांकडून ब्लॅकमेलिंग 
तेजस दिलीप सोनवणे (वय-२०) याच्यानंतर त्याचा मित्र चेतन पीतांबर सोनार याने मोबाईल चित्रणाद्वारे ब्लॅकमेलिंग करून मुलीवर अत्याचार सुरुच ठेवला होता. घाबरलेल्या मुलीने अनेक वेळा विनवण्या करुनही उपयोग होत नसल्याने तिने बाहेर येणे-जाणे बंद केले होते. तिच्या संपर्कातील मैत्रिणींना तिच्या बद्दल वाईट बोलून तिला त्रास देणे सुरू होते. ती बाहेर दिसताच घाणेरडी शेरे..बाजी करून त्रास दिला जात असल्याने अखेर पिडीतेने घडला प्रकार पालकांना सांगितला. घडल्या प्रकार बाबत पिडीतेच्या तक्रारी वरून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  

संशयित फरार..
संशयित तेजस दिलीप सोनवणे हा शहरातील एका राजकीय महिला पदाधिकाऱ्याचा मुलगा असून गुन्हा दाखल होण्याची चुणूक संशयितांना लागल्याने दोघेही फरार झाले असून दाखल गुन्ह्यात पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक अधीक्षक डॉ.निलाभ रेाहन यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असून निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या गुन्हेशोध पथकातील दिनेशसींग पाटील, हकीम शेख यांना गुप्त माहिती मिळाल्यावरून देाघा संशयितांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Degha tortures a minor girl by using mobile pictures