
जळगाव, : कारागृहातून तिन्ही संशयितांना पळवून नेणाऱ्या जगदीश पाटीलने गुन्हे शाखेच्या पथकासमक्ष कारागृहाच्या २० फूट उंच भिंतीवरून पिस्तूल आत फेकून दाखवले. नेमक्या ठिकाणी एका मागून एक तीन पिस्तूल फेकल्यानंतर २५ जुलैला पळून जाण्याची योजना फलद्रूप झाल्याचे जगदीशने तपासात सांगितले.
गुन्हे शाखेने सोमवारी (ता. २४) अटक केलेल्या जगदीश पाटील याची कोठडीत चौकशी सुरू आहे. त्यात त्याने तीन पिस्तूल कारागृहात पोचवल्याचे कबूल केले आहे. कारागृहाच्या २० फूट उंच भिंतीवरून नेमक्या ठिकाणी पिस्तूल फेकल्यानंतर त्या सुशील मगरे, गौरव पाटील, सागर पाटील या तिघांच्या हाती पडल्या. आतमध्ये त्यांच्याजवळ पूर्वीपासूनच मोबाईल असल्याने त्यावर ते संपर्कात होते. बडतर्फ पोलिस सुशील मगरे कारागृहाचे काम आणि उपलब्ध मनुष्यबळाचा अभ्यास करीत होता. त्यानुसार २५ जुलैला गेटवर कमी कर्मचारी व अधिकारी सुटीवर असल्याची संधी साधत सकाळी साडेसातला ‘ते’ तिघेही सुरक्षारक्षक पंडित गुंडाळे याला पिस्तूल लावून व मारहाण करून कारागृहाबाहेर येण्यात यशस्वी झाले व नंतर त्यांना चोरून आणलेल्या दुचाकीने नवापूरपर्यंत आणल्याची माहिती जगदीशने तपासात दिली.
मगरे मास्टरमाइंड
संशयित जगदीश आणि सागर पाटील यांची कसून चौकशी सुरू असून, जेल तोडण्याची योजना सुशील मगरे यानेच आखली होती. त्यानुसार जगदीशने गावठी पिस्तूल उपलब्ध करून कारगृहात तिघांपर्यंत पोचविल्या. जगदीशने जिल्हा कारागृहातून नेमके कसे पिस्तूल आत फेकले, याचे प्रात्यक्षिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर करून दाखवले. ही घटना तपासात महत्त्वाची पुरवा ठरणार असून, आत फेकलेले पिस्तूल नेमके आणले कोठून, याचा पोलिस शोध घेत आहेत.
सागरला चार दिवस कोठडी
संशयित सागर पाटील याला गुन्हे शाखेने नवापूर येथून शुक्रवारी (ता. २८) अटक केली. शनिवारी (ता. २९) त्याला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश एस. एन. फड यांनी त्याला २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे ॲड. बी. यू. पाटील यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.