नववीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास ; मृत्युचे कारण अद्यापही अस्पष्ट 

रईस शेख
Tuesday, 4 August 2020

मोराणे(धुळे) येथील मूळ रहिवासी विनोद सुर्यवंशी तीन ते चार वर्षापूर्वीच खोटेनगरात स्थायीक झाले आहेत. खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना हर्षल व विनय अशी दोन मुले त्यापैकी हर्षल हा मोठा होता. तो घराजवळील मानवसेवा शाळेत इयत्ता नववीचे शिक्षण घेत होता. कुठलेही कारण नसतांना मुलाने गळफास का घेतला असा प्रश्‍न कुटुंबियांना सतावत आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

जळगाव,: -घरात वडील झोपलेले असतांना मागच्या खोलीत नववीचा विद्यार्थी हर्षल विनोद पाटील (सुर्यवंशी) वय 13 रा. मानवसेवा शाळेजवळ खोटेनगर याने साडीच्या सहाय्याने गळफास केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली. नेमके आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

घरातील दोन खोल्यांपैकी एका खोलीत मंगळवारी हर्षलचे वडील विनोद हिलाल सुर्यवंशी झोपले होते. तर हर्षलची आई साधना ह्या बाहेर गेलेल्या होत्या. यादरम्यान घराच्या मागच्या खोलीत हर्षलने साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. बाहेर गेलेल्या साधना सुर्यवंशी घरी आल्यानंतर त्यांना हर्षल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी हंबरडा फोडत आक्रोश केला. घटना कळवल्यानंतर उपनिरिक्षक कदीर तडवी, सहाय्यक फौजदार साहेबराव पाटील,अनिल तायडे यांनी घटनास्थळ गाठले. घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषीत केल्यावर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. हर्षलच्या पित्याचा आक्रोश बघून परिचीतांनाही अश्रू अनावर झाले होते. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल तायडे हे करीत आहेत. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मोराणे(धुळे) येथील मूळ रहिवासी विनोद सुर्यवंशी तीन ते चार वर्षापूर्वीच खोटेनगरात स्थायीक झाले आहेत. खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांना हर्षल व विनय अशी दोन मुले त्यापैकी हर्षल हा मोठा होता. तो घराजवळील मानवसेवा शाळेत इयत्ता नववीचे शिक्षण घेत होता. कुठलेही कारण नसतांना मुलाने गळफास का घेतला असा प्रश्‍न कुटुंबियांना सतावत आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर हर्षलचा मृतदेह मूळ गावी मोराणे ( धुळे) येथे नेण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Ninth grader choked; The cause of death is still unclear