जळगाव : दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

जळगाव : दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील कांचननगर येथील विवाहितेचा माहेरून दहा लाख रुपये आणावेत, यासाठी छळ करणाऱ्या मालेगाव तालुक्यातील पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात शुक्रवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच तरुणीचा संसार मोडला आहे.

जळगाव शहरातील कांचननगर येथील समीक्षा रोहित दरेकर (वय २१) यांचा रोहित लक्ष्मण दरेकर (रा. जाजूवाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्याशी गेल्या वर्षी विवाह झाला. समीक्षा हिने तिच्या माहेरून दहा लाख रुपये आणावेत, यासाठी तिच्या पतीसह सासरच्यांकडून वर्षभरापासून शिवीगाळ, तसेच मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे. यादरम्यान सासरच्यांनी तिचे दागिने काढून घेतले, तसेच तिला घरातून हाकलून दिले. ‘पैसे आणले तर ये, नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही’, अशी धमकीही सासरच्यांनी दिली.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

छळाला कंटाळून समीक्षा या ऑगस्ट २०२१ ला कांचननगर येथील माहेरी आल्या आहेत. याप्रकरणी समीक्षा दरेकर यांनी (शुक्रवारी, १९ नोव्हेंबर) दिलेल्या तक्रारीवरून तिचे पती रोहित दरेकर, सासरे लक्ष्मण दरेकर, सासू लता लक्ष्मण दरेकर (सर्व रा. जाजूवाडी, ता. मालेगाव, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध शनिपेठ

पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक योगेश माळी करीत आहेत.

loading image
go to top