Jalgaon News : अमळनेरला पंचायत समितीची ग्रीन बिल्डींग : मंत्री अनिल पाटील

Jalgaon : तालुका पंचायत समितीच्या पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग साठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने १० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
Minister Anil Patil
Minister Anil Patil esakal

Jalgaon News : तालुका पंचायत समितीच्या पर्यावरणपूरक ग्रीन बिल्डिंग साठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने १० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

यापूर्वी ११ कोटींची महसूल इमारत , १४ प्रशासकीय इमारत , १० कोटींची एस टी आगार कार्यशाळा आणि आता पंचायत समितीची १० कोटींची नवीन इमारत होणार असल्याने शहराचे स्वरूप पालटणार आहे. (Jalgaon Minister Anil Patil statement Amalner Panchayat Samiti Green Building)

विशेष म्हणजे या सर्व इमारती धुळे चोपडा रस्त्याला लागून एकाच बाजूला जवळजवळ असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. अमळनेर पंचायत समितीची इमारत १९६१ साली बांधण्यात आली होती. ५४ वर्षे झाल्याने इमारत जीर्ण झाली होती. तसेच सुविधा अपूर्ण पडत होत्या. म्हणून मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हा परिषदे मार्फत नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा सुरू केला.

विशेष म्हणजे शासनाने प्रशासकीय मान्यता देताना पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ग्रीन बिल्डिंग संकल्पना अमलात आणून नैसर्गिक प्रकाश योजना , वायुवीजन , पाण्याच्या व विजेच्या वापरात काटकसर , पर्जन्य जलपुनर्भरण , जास्तीत जास्त पर्यावरण पूरक बांधकाम साहित्य व साधन सामग्रीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (latest marathi news)

Minister Anil Patil
Jalgaon Lok Sabha Election : जिल्ह्यात मतदार संख्येत 18 हजारांची वाढ; आता 35 लाखांवर मतदार

जुन्या इमारतीत महिला प्रसाधनगृह नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. नवीन इमारतीत महिला प्रसाधनगृह आणि विश्रांतीकक्ष , अपंगांसाठी विविध सुविधा तसेच रॅम्प रेलिंग करण्यात येणार आहे. पंचायत समितीची नवीन इमारत जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाच्या जागेत होणार आहे. मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजित पवार , ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन , पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्य लाभले.

अमळनेर बसस्थानकाच्या आजूबाजूला सर्व कार्यालये उभारणी सुरू झाल्याने ग्रामीण भागातून अथवा बाहेरगावाहून येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला एकाच वेळी सर्व कामे करताना त्रास होणार नाही. तसेच वेळ आणि रिक्षा किंवा इतर खर्च वाचणार आहे. - अनिल पाटील ,मदत व पुनर्वसन मंत्री

Minister Anil Patil
Jalgaon News : भेदभाव न करता चौफेर विकास साधण्याचा प्रयत्न : पालकमंत्री पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com