

Jalgaon
esakal
जळगाव: जूनचा पंधरवडा आला तरी अजून शहरासह जिल्ह्यात मॉन्सूनने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाडा व दमट वातावरणाचा सामना करणाऱ्या जळगावकरांना येत्या आठवड्यात काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात १४ ते १८ जूनदरम्यान ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शनिवारीही दिवसभर ढगाळ वातावरण व ऊन यांचा खेळ सुरू होता.