Jalgaon Weather News
esakal
जळगाव : जिल्ह्यात मॉन्सूनच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अद्यापही दमदार पावसासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे (Jalgaon Monsoon Update) आहेत. आजपासून (ता. १८) ते २१ जून या कालावधीत जिल्ह्यात हवामानात काही प्रमाणात बदल जाणवतील. जिल्ह्यातील काही भागांमध्ये गुरुवारी (ता. १८) दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या ते तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात, असा अंदाज आहे.