

जळगाव : जिल्ह्यात विधानसभेची आचारसंहिता सुरू आहे. या आदर्श आचारसंहितेंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून शासकीय- प्रशासकीय व खासगी मालमत्तांवर असलेल्या विविध राजकीय पक्षांचे चिन्ह, झेंडे, बॅनर, फलक आदी साहित्य पहिल्या ४८ व नंतरच्या ७२ तासांत हटविण्यात आलेत. आतापर्यंत जिल्हाभरात सुमारे ४४ हजार ८६८ झेंडे, बॅनर, फलक आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत. (More than 44 thousand banners removed in district)