Jalgaon MSRTC News : 4 महिन्यात 713 प्रवाशांनी वापरला क्युआर कोड! एसटी तिकिट भाडे देण्यासाठी डिजिटल सुविधा

Jalgaon News : एसटीत डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांनी सुविधेबाबत समाधान व्यक्त केले आहे.
MSRTC Digital Payment
MSRTC Digital Paymentesakal

पारोळा : एसटी बस मध्ये तिकिटाची रक्कम किंवा क्यूआर कोड ने देण्याची सुविधा डिसेंबर पासून सुरू झाली. अमळनेर विभागात आतापर्यंत ७१३ प्रवाशांनी ऑनलाइन तिकीट काढले. एसटीत डिजिटल सुविधा उपलब्ध झाल्यामुळे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्यांनी सुविधेबाबत समाधान व्यक्त केले आहे. (Jalgaon MSRTC 713 passengers used QR code in 4 months)

राज्य सरकारने सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळे एसटीला अच्छे दिन आले असून सर्वात जास्त महिला वर्ग आज एसटीत प्रवास करीत आहे. अशातच एसटीने मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट वितरण सुरु केले. मात्र सुटे पैसे किंवा प्रवाशांकडे मोठी नोट असल्यामुळे वाहकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत होते.

त्यामुळे प्रवाशांची गरज ओळखता एसटीत कॅशलेस व्यवहारावर भर देत वाहकांकडे क्युआर कोडची सुविधा देण्यात आली. राज्यातील सर्व बसमध्ये तारीख ११ डिसेंबर पासून पहिल्या टप्प्यात यूपीआय क्यूआर कोड च्या माध्यमातून तिकीट देण्याची सोय सुरू झाली आहे. या सुविधेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान अमळनेर डेपोच्या माध्यमातून चार महिन्यात ७१३ प्रवाशांनी ऑनलाइन सुविधेचा लाभ घेतला.

कशी कराल तक्रार

मशीनवर क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांच्या बँक खात्यातून पैसे वजा झाले मात्र तिकीट आले नाही तर तक्रार करता येणार आहे एअरटेल नंबर धारकांनी ४०० या क्रमांकावर आणि इतरांनी ८८००६८८००६ या क्रमांकावर संपर्क साधावा त्याचबरोबर Wecore@aritelbank.com या ईमेलवर तक्रार करता येते अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. (Latest Marathi News)

MSRTC Digital Payment
Jalgaon: अंजनी प्रकल्प वाढीव उंचीचे काम रखडले! पद्मालय प्रकल्प दोनच्या कामालाही ‘ब्रेक’, 40 हजार एकर क्षेत्र सिंचनापासून वंचित

नेटवर्कची बाधा

नेटवर्कमुळे ऑनलाइन तिकिटाला बाधा ग्रामीण ,डोंगराळ भागात नेटवर्क नसल्यामुळे टाईम आऊट होणे, मशीन हँग होणे, बंद पडणे अशा अडचणींना सामना करावा लागतो त्यामुळे वाहकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महिना ऑनलाइन तिकीट संख्या, रक्कम

जानेवारी प्रवासी १८४-रक्कम १२२६५

फेब्रुवारी-१२-रक्कम १५०

मार्च-१६-रक्कम १११०

एप्रिल-३९२ रक्कम-३८७९०

मे- एक मे ते सहा मे-१०९ रक्कम २१ हजार ५५५

एकूण रक्कम ७३ हजार ८७०

"अमळनेर विभागातील प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड तिकीट इशू मशीन आहे. प्रवाशांनी जास्तीत जास्त प्रमाणात क्यु आर कोड आणि यूपीआय द्वारे रक्कम देऊन या सुविधेचा फायदा घ्यावा."

- इम्रान पठाण, (आगार व्यवस्थापक अमळनेर)

MSRTC Digital Payment
Jalgaon Railway News : 6 महिने आधीच रिझर्व्हेशन का केले? रेल्वेच्या आरक्षित डब्यांतील घुसखोरी वाढली; प्रवाशांना मनस्ताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com