Jalgaon : मनपा आयुक्तांनी घेतली ‘वॉटरग्रेस’ मुकादमांची झाडाझडती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon municipal corporation

Jalgaon : मनपा आयुक्तांनी घेतली ‘वॉटरग्रेस’ मुकादमांची झाडाझडती

जळगाव : लांब केस, कपाळावर टिळा असे तब्बल दोन ते तीन कर्मचारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीत बसले होते. या वेळी महापालिका आयुक्त नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याही समस्या ऐकून घेत होते. त्याच वेळी त्यांचे लक्ष या लोकांकडे गेले, त्यांनी विचारले कोण हे टिळेवाले...त्या वेळी ते कर्मचारी गप्प बसले. मात्र इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बोला असे सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, मॅडम आम्ही, मुकादम ‘वॉटरग्रेस’चे कर्मचारी आहोत.

महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी तेराव्या मजल्यावरील सभागृहात आरोग्य विभागाची बैठक घेतली. या वेळी त्यांनी शहरातील साफसफाई तसेच इतर कामांचा आढावा घेतला. त्यांनी साफसफाईबाबत सूचनाही केल्या. या वेळी त्या बाहेर भेटण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही अधूनमधून भेट घेत होत्या. त्या वेळी त्यांचे या टिळेधारक कर्मचाऱ्यांकडे लक्ष गेले आणि त्यांनी कोण हे टिळेवाले? असे विचारले. त्यावेळी त्या कर्मचाऱ्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. मात्र इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना बोला, असे सांगितले. त्यावेळी ते म्हणाले, मॅडम, आम्ही वॉटरग्रेसचे कर्मचारी आहोत.‘मुकादम’ आहोत. त्यानंतर आयुक्तांनी त्यांना सफाईबाबत प्रश्‍न विचारला परंतु त्यांना काही माहिती देता आली नाही. मात्र आता आयुक्तांनी या मुकादमांना महापालिकेच्या मुकादमासोबत काम करून प्रत्येक घरोघरी जावून घंटागाडीत कचरा टाकण्याबाबत प्रबोधन करण्याचे आदेश आहेत.

हेही वाचा: ZP अन् पालिकांचे नवे सदस्य ठरवणार आमदार; 6 महिन्यांत होणार निवडणूक

कोण आहेत, हे टिळेवाले

जळगाव महापालिकेतर्फे सफाईचा मक्ता ‘वॉटरग्रेस’ या कंपनीस देण्यात आला आहे. त्यांच्यातर्फे कर्मचारी आणि अनेक प्रभागात मुकादम लावण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, काही मुकादम हे नगरसेवकांच्या माध्यमातून मक्तेदाराने लावले आहेत. काही नगरसेवकांचे दोन दोन कर्मचारी लावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ते नगरसेवकांचेही कार्य करतात आणि मुकादम म्हणूनही हजेरी भरत असतात, असेही सांगण्यात येत आहे. यातील बहुतेक जण टिळा लावत असतात. तसेच नगरसेवकांचा कार्यकर्ता म्हणून आपली वेगळी ओळखही ठेवत असतात. अनेक वेळा हे मुकादम कामावर हजर असतात, तर कधी नसतातही. आज आयुक्तांनी आयोजित केलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत हे मुकादमही हजर होते. महत्त्वाचे म्हणजे वॉटरग्रेस कंपनीचा मक्ता असलेल्या मुकादम कर्मचाऱ्यांच्या हाताखाली महापालिकेचे कायम कर्मचारी आहेत. तसेच या मुकादमांना सफाईबाबत कोणतीही माहिती नाही, अशीही माहिती प्राप्त झाली आहे.

हेही वाचा: ग्रामसेवकासह सरपंचपतीस 6 हजारांची लाच भोवली

Web Title: Jalgaon Municipal Commissioner Takes Action Against Watergrass Employees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top