जळगाव : रावेर येथे पालिकेच्या नालेसफाईचा बोजवारा

gutters water flowing on road
gutters water flowing on roadesakal

रावेर (जि. जळगाव) : पालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या थातुरमातूर नालेसफाईचे (Gutter Cleaning) पितळ नुकतेच सातपुड्यात झालेल्या जोरदार पावसाने (Heavy Rain) उघडे पडले. सातपुड्याच्या कुशीत झालेल्या जोरदार पावसाने शहरातील जुना सावदा रोडवरील पुलावर दोन ते तीन फूट पाणी वाढल्याने येथील वाहतूक सुमारे दोन तास खोळंबली होती. शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या नाल्याची सफाई पालिकेच्या स्वच्छता विभागाने थातूरमातूर केल्याचे यातून दिसून आले आहे. (Jalgaon Municipal Corporation incomplete work gutter celaning Jalgaon News)

नागझरी कुंडापासून ते जुन्या सावदा रोडपर्यंत सुमारे १ किलोमीटर लांबीच्या या नाल्यात आवश्यकता नाही त्या ठिकाणी जेसीबी उतरवून सफाई केल्याचे पालिकेकडून दाखवण्यात आले. मात्र नवीन सावदा रोडवरील पूल ते जुना सावदा रोडवरील पुलादरम्यानच्या भागात जमा झालेला गाळ, झाडेझुडपे आणि कचरा काढण्यात आला नाही. रविवारी (ता १२) दुपारी सातपुड्याच्या कुशीत झालेल्या जोरदार पावसाने या नागझिरी नाल्याला पूर आला. शहरात पावसाचा एकही थेंब पडलेला नसताना जुना सावदा रोडवरील या पुलावरून २ ते ३ फूट पाणी वाहत होते. पुलाच्या उत्तरेला मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने व नाल्याच्या पात्रात झाडेझुडपे असल्याने पाणी पुलावरून वाहत होते. या परिसरातील सुमारे दहा-बारा कॉलन्यांमधील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

gutters water flowing on road
घरकुल मंजूरीमध्ये अमळनेर नगरपरिषद नाशिक विभागात प्रथम

याच पुलावरून आणि रस्त्यावरून पालिकेच्या मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे आणि सुधीर पाटील आणि सुरज चौधरी हे दोन मावळते नगरसेवक रोज अनेकदा ये-जा करतात. या नाल्याची नीट सफाई केली असती, कचरा, झाडेझुडपे काढली असती तर पुलाखालून एवढे पाणी सहज वाहून गेले असते. मात्र स्वच्छता विभागाच्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या दिरंगाईने नालेसफाईचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांना दोन किलोमीटरचा फेरा घालून शहरात यावे लागले, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेने यापुढील काळात तरी या भागातील नालेसफाई व्यवस्थित करावी, अशी मागणी होत आहे.

gutters water flowing on road
Jalgaon : कौटुंबिक वादातून न्यायालयासमोर 2 गटांत ‘फ्री स्टाइल’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com