

Jalgaon Election Shock As Independent Woman Candidate Gets Zero Votes
Esakal
Jalgaon Election: निवडणुकीच्या निकालात ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचे आरोप आतापर्यंत अनेकदा झाले आहेत. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीत निकालावर शंका व्यक्त करत जळगावातील एका अपक्ष उमेदवारानं खळबळजनक असे आरोप केले आहेत. अपक्ष उमेदवाराला शून्य मतदान मिळाल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. जळगावातील महिला उमेदवार सुनंदा भागवत फेगडे यांनी प्रश्न उपस्थित केला की, घरच्यांचे राहुदे, पण माझं स्वत:चं मत कुठे गेलं?