जळगाव
Jalgaon Municipal Election जळगावात ठाकरे गटाची सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष मदत? प्रवीण माळी यांच्या निर्णयाने खळबळ
Jalgaon Municipal Election : याआधीही ठाकरे गटाच्या काही उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीला फायदा झाला होता. हा निर्णय रणनीतीचा भाग की अंतर्गत मतभेद, याबाबत संभ्रम असून निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार प्रवीण विष्णू माळी यांनी अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

