Jalgaon News : सफाई मक्तेदार ‘वॉटरग्रेस’ला महापालिकेची नोटीस : 7 दिवसांचा अवधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : सफाई मक्तेदार ‘वॉटरग्रेस’ला महापालिकेची नोटीस : 7 दिवसांचा अवधी

जळगाव : शहरात कचरा गोळा करणारी ३५ वाहने बंद आहेत, सात कॉम्पॅक्टरही बंद आहेत. तरीही कचरा गोळा होत असून, साफसफाई चांगली होत असल्याचा दावा आपल्यातर्फे करण्यात येत आहे. सात दिवसांच्या आता ही वाहने दुरुस्त करावीत, अशी नोटीस महापालिकेच्या आरोग्य विभागाने सफाई मकतेदार ‘वॉटरग्रेस’ कंपनीला बजावली आहे.

हेही वाचा: Crime News : दूध संघ गैरव्यवहार प्रकरण; FDAला कस्टडीतूनच मिळवावे लागणार नमुने

जळगाव शहरातील कचरा सफाई करून तसेच वाहनाद्वारे कचरा संकलित करून तो डंपिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्याचा मक्ता ‘वॉटरग्रेस’ कंपनीला देण्यात आला आहे. महालिकेने कचरा गोळा करण्यासाठी तब्बल १५० वाहने मक्तेदारला दिली आहेत. मात्र यातील तब्बल ३५ वाहने बंद आहेत. तर सात कॉम्पॅक्टरही बंद पडले आहेत, तरीही मक्तेदारातर्फे शहरात चागंली साफसफाई होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग जागा झाला आहे. त्यांनी थेट वॉटरग्रेस कंपनीला नोटीस पाठविली आहे. शहरातील कचरा संकलन करणारी ३५ वाहने बंद पडल्यामुळे दैनंदिन साफसफाईवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने नादुरस्त वाहनांची दुरुस्ती करून सात दिवसांत त्याचा अहवाल महापालिकेच्या आरोग्य विभागाला सादर करण्यात यावा, असे यात म्हटले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी ही नोटीस बजावली आहे.

हेही वाचा: Twitter Bird : ट्वीटरच्या निळ्या चिमणीचं काय आहे खरं नाव, जाणून घ्या कहाणी

‘वॉटरग्रेस’च्या उत्तराकडे लक्ष

सफाई मक्तेदार वॉटरग्रेस कंपनीच्या कामाबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र महापालिकेतील सत्ताधारी गटातील एका मोठ्या नेत्याचा त्यांना आशीर्वाद असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी धाडस दाखवून नोटीस बजावली आहे. नेहमीप्रमाणे मक्तेदार त्याला कचऱ्याची टोपली दाखविणार की कोणते उत्तर देणार, याकडेच लक्ष आहे.