Jalgaon News : वृक्षांविना बोडका दिसतोय राष्ट्रीय महामार्ग! भुसावळ तालुक्यातील महामार्ग आजही वृक्षारोपणाच्या प्रतीक्षेत

Jalgaon News : आता महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी लोकार्पण होऊनही वृक्षारोपण झाले नसल्याने वृक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
The national highway in the taluka with a bodka view without trees.
The national highway in the taluka with a bodka view without trees.esakal

भुसावळ : भुसावळ शहरासह तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर ठराविक ठिकाणी महामार्ग प्राधिकरणाने वृक्षारोपण केले. मात्र, उर्वरित सर्व महामार्ग वृक्ष रोपणाच्या प्रतीक्षेत आहे. तापमानवाढ व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातून गेलेल्या महामार्गाच्या चौपदरी करणासाठी गेल्या १० ते ११ वर्षांपूर्वी वृक्षतोड झाली होती. आता महामार्गाचे दोन वर्षांपूर्वी लोकार्पण होऊनही वृक्षारोपण झाले नसल्याने वृक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Jalgaon national highway without trees highway in Bhusawal taluka still waiting for tree plantation marathi news)

भुसावळ तालुक्यातून मार्गक्रमण झालेल्या सुरत-नागपूर महामार्गाचे रुंदीकरणासोबतच चौपदरीकरणापुर्वी महामार्गावरील १० ते ११ वर्षांपुर्वी शेकडो वर्षे वयाचे निंब जातीच्या विविध हिरवेगार व डेरेदार हजारो वृक्षांची महामार्ग प्राधिकरणाने बेसुमार कत्तल केली होती.

‘झाडे लावा-झाडे जगवा’ हा नारा देत दरवर्षी पावसाळ्यात जनतेला वृक्षारोपणाचा संदेश देणाऱ्या शासनाला रस्ता रुंदीकरणात वृक्षतोड केलेल्या रस्त्यावर वृक्ष लागवडीचा विसर पडला. त्यामुळे वृक्षप्रेमींमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्राधिकरण विभागाने महामार्ग रस्ता रुंदीकरणासह चौपदरीकरणाचे काम सुरू केले आणि या महामार्गावरील घनदाट रस्त्याचे रूपांतर ओसाड रस्त्यात झाले.

वृक्षतोड प्रसंगी महामार्ग प्राधिकरण विभागाकडून सांगण्यात येत होते की, लवकरच या महामार्गावर नवीन वृक्ष लागवड करण्यात येईल व हे रस्ते पुन्हा हिरवेगार होतील. मात्र, अद्यापही महामार्ग बोडकाच आहे. तालुक्यातील साकेगाव ते बोहार्डि या ३० किलोमीटर अंतरामध्येच हजारो वृक्षांची निर्दयीपणे कत्तल करण्यात आली होती.

मात्र, रस्ता रुंदीकरणानंतर आजपर्यंत या रस्त्यावर एकही वृक्ष लावण्यात आलेले नाहीत. वृक्ष लागवडीबाबत महामार्गाचे प्राधिकरण विभाग शासनाची निष्काळजी दिसून येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडांची कत्तल करण्याआधी नवीन वृक्षलागवड करणे अपेक्षीत होते. मात्र, शासनाच्या उदासिनतेमुळे ते शक्य होऊ शकले नाही. (latest marathi news)

The national highway in the taluka with a bodka view without trees.
Pandharpur News: पंढरपूर शहरातून होतेय जड वाहनांची धोकादायक वाहतूक, नागरीकांचा जिव धोक्यात

तरी प्राधिकरणाने आता तरी वृक्ष लागवडीचे व संगोपणाचे काम हाती घ्यावे, असे मत वृक्षप्रेमींनी व्यक्त केले. महामार्ग प्राधिकरणामार्फत २०१३-२०१४मध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी डेरेदार वृक्षांची तोड केली. मात्र, तब्बल आठ वर्षांनतरही महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झालेल्या भागात अद्यापही प्राधिकरणाने दुतर्फा वृक्षलागवड सुरू केलीच नाही.

दीर्घ आयुष्य जगणाऱ्या वृक्षांचे वृक्षापोपण करा

भुसावळ येथे शहरात नवोदय विद्यालयाच्या पुलाच्या परिसरात व वरणगाव हिरा मारुती मंदिर परिसरात अल्प आयुष्य व लवकर मोठे होणारे कमकुवत असलेल्या कडू बदाम या वृक्षांची लागवड करून शुशोभिकरण करण्यात आले, वास्तविक पाहता वड, पिंपळ, औदुंबर, कडूनिंब, चिंच, शिसम अशा विविध प्रजातींचे वृक्षारोपण करणे अपेक्षीत होते.

आणि कृक्षांची कत्तल करताना याच जातींच्या वृक्षांची कत्तल केली गेली आहे. शासनाने व महामार्ग प्राधिकरण विभागाने महामार्गाच्या दोन्ही बाजूने तत्काळ दीर्घ आयुष्य जगणाऱ्या वृक्षांचे वृक्षापोपण करावे, अशी मागणी वृक्षप्रेमींकडून केली जात आहे.

The national highway in the taluka with a bodka view without trees.
Jalgaon News: सूप, टोपली, केरसुणी होतेय कालबाह्य! बदलत्या क्रेझचा परिणाम; ग्रामीण भागातील मंगल कार्यात परंपरेला आजही महत्त्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com