Jalgaon News: सूप, टोपली, केरसुणी होतेय कालबाह्य! बदलत्या क्रेझचा परिणाम; ग्रामीण भागातील मंगल कार्यात परंपरेला आजही महत्त्व

Jalgaon News : मंगल कार्यात लग्नाअगोदर केरसुनी, टोपली (डालकी) व सूप यांची विधिवत पूजा करून शुभ कार्याला सुरवात केली जाते.
Citizens while buying baskets and baskets.
Citizens while buying baskets and baskets.esakal

पारोळा : बदलत्या आधुनिक युगामुळे समाजमनात विविध बदल दिसून येत आहेत. या बदलत्या युगामुळे रेडिमेडची सवय सर्वांनाच लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शारीरिक व्यायामापासून माणूस लांब जाताना दिसून येत आहे. मंगल कार्यात लग्नाअगोदर केरसुनी, टोपली (डालकी) व सूप यांची विधिवत पूजा करून शुभ कार्याला सुरवात केली जाते. मात्र, या तिघांची जागा आता आधुनिकरणाच्या क्रेझमुळे रेडिमेड वस्तूंनी घेतली आहे. (Jalgaon Basket Kersuni become old fashioned)

शहरासह ग्रामीण भागात पोळी व भाकर ठेवण्यासाठी टोपली (डालकी) वापरली जात होती, लक्ष्मी म्हणून घरातघरांत केरसुणी दिसत होती, तर गहू ज्वारी व बाजरी आडसण्यासाठी सुपचा वापर केला जात होता. मात्र, या तिघांची जागा हळूहळू कालबाह्य होताना दिसून येत आहे.

दरम्यान, या व्यवसायातून शहरातील साहेबराव अंभोरे यांची सातवी पिढी आजही आत्मनिर्भरपणे या व्यवसायातून कुटुंब सांभाळत आहे. केरसुणी, सूप व टोपली (डालकी) विकून शहरातील तब्बल २५ कुटुंब या व्यवसायाच्या माध्यमातून जुन्या वस्तूंची आठवण ठेवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.

केरसुणी घर व परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मूळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी बनते. महाराष्ट्रासह खानदेशात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा करण्याची पद्धत आहे. खानदेशात कानबाई उत्सवात टोपलीची पूजा करून रोट पूजन केले जाते. (latest marathi news)

Citizens while buying baskets and baskets.
Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

भुसावळ-धुळे येथून खरेदी

पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवड येथून काही वर्षांपूर्वी मूळ गवत आणून केरसुणी, सूप व टोपली (डालके) तयार केली जात होती. मात्र, त्याला तयार करण्यासाठी कालावधी जास्त लागत होता. त्यामुळे येथील व्यावसायिक भुसावळ व धुळे येथून होलसेल दराने केरसुणी टोपली (डालके) व सूप आणून ते बाजारात विकत आहेत.

मात्र, आजही ग्रामीण भागात सूप, टोपली (डालके) व केरसुणी प्रत्येक घरी दिसून येते. या वस्तू जिवंत ठेवण्यात ग्रामीण भागाचा सिंहाचा वाटा आहे. वयोवृद्ध व्यक्ती आजही या वस्तूंचा आदर करते व नजरचुकीने केरसुणीवर पाय पडला, तर आदरपूर्वक तिला नमस्कार करतो. ही संस्कृती ग्रामीण भागात आजही जिवंत आहे.

"बदलत्या क्रेझमुळे या व्यवसायाला घरघर लागली आहे. मात्र, पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे."

-साहेबराव अंभोरे, व्यावसायिक, पारोळा

"आधुनिक युग आले असले तरी ‘जुने ते सोने’ या म्हणीप्रमाणे केरसुणी, सूप व डालके वापरण्याची पद्धत हळूहळू कमी होत आहे. मात्र, असे असले तरीही या वस्तू वापरण्याचा आनंद वेगळाच आहे."-आशा पाटील, गृहिणी, पारोळा

Citizens while buying baskets and baskets.
Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com