Latest Jalgaon News | जळगावचे आजोळ असलेल्या सुरभीने गाजविले KBC! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Megastar Amitabh Bachchan felicitating Surbhi Tripathi, a participant in the 'Kaun Banega Crorepati' program, with a gift.

Jalgaon News : जळगावचे आजोळ असलेल्या सुरभीने गाजविले KBC!

जळगाव : ‘सोनी एन्टरटेन्मेंट’ या वाहिनीवर सुरू असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात जळगाव येथील आजोळ असलेली सुरभी त्रिपाठी हिने अकरा प्रश्‍नांपर्यंत अचूक उत्तरे देत सहा लाखांवर पॉइंट्सची कमाई केली. (jalgaon native Surbhi famous at KBC Latest Jalgaon News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik News : नाशिक खरंच सुंदर शहर; आणखी सुंदर होऊ शकते : मावळते आयुक्त नाईकनवरे यांना आशावाद

महानायक अमिताभ बच्चन संचालन करीत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिॲलिटी शोमध्ये ज्युनिअर गटातील स्पर्धकांमधून सुरभी ही चौथीत शिकत असलेली नऊ वर्षांची चिमुकली सहभागी झाली होती. १२ व १३ डिसेंबरला तिचा एपिसोड प्रसारित झाला. या कार्यक्रमात सुरभीने एकूण ११ प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन सहा लाख ४० हजार पॉइंट्स जिंकले. १२ व्या १२ लाख ५० हजार पॉइंट्सच्या प्रश्नाचे उत्तर येत असूनही खात्री नसल्याने रिस्क न घेता तिने खेळ थांबविला. १८ व्या वर्षी तिला हे पॉइंट्स पैशांच्या रूपात मिळतील.

सुरभी आई-वडिलांसमवेत अहमदाबाद येथे वास्तव्यास असून, तिचे आजोळ जळगावातील श्रद्धा कॉलनीतील आहे. रेल्वेतून निवृत्त झालेले स्टेशन अधीक्षक अरुण पाटील यांची ती नात (मुलीची मुलगी) आहे. सुरभीला चित्रकलेची विशेष आवड असून, मोठी चित्रकार होण्याचे तिचे स्वप्न आहे. तिचे स्वतःचे यू-ट्युब चॅनलही आहे.

हेही वाचा: Nashik News : शाही मशीद विश्‍वस्तांकडे अखेर जागेचा ताबा!