Nashik News : शाही मशीद विश्‍वस्तांकडे अखेर जागेचा ताबा!

Court representative, Bhadrakali Police handing over possession of premises to Shahi Masjid Trustees.
Court representative, Bhadrakali Police handing over possession of premises to Shahi Masjid Trustees.esakal

जुने नाशिक : न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीच्या जागेवर राहत असलेल्या कुटुंबीयांचे अतिक्रमण काढले. तत्पूर्वी पोलिस बंदोबस्तात कुटुंबीयांचे राहते घर रिकामे करून शाही मशीद विश्वस्तांकडे जागेचा ताबा न्यायालयाच्या प्रतिनिधींकडून देण्यात आला. त्यामुळे त्या ठिकाणी काहीसा तणाव निर्माण झाला होता. पोलिस मध्यस्थीमुळे कुठल्याही प्रकारच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. (Shahi Masjid trustees finally get possession of site Nashik News)

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Court representative, Bhadrakali Police handing over possession of premises to Shahi Masjid Trustees.
Nashik News : बापू गांधीनगरचे रहिवासी भोगताय नरकयातना!

शाही मशिदीच्या जागेत अनेक वर्षांपासून एक लोहार कुटुंबीय राहत होते. जागेचा वाद न्यायालयात गेला. गेल्या सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून न्यायालयात वाद सुरू होता. न्यायालयाचा निकाल शाही मशीद विश्वतांकडून लागला होता. त्यासंदर्भात त्या कुटुंबीयांकडून उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्या ठिकाणीही विश्वस्तांच्या बाजूने निकाल लागला. तरीदेखील जागेचा ताबा दिला जात नव्हता. विश्वस्तांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाकडून अधिकृत ताबा घेण्यासाठी न्यायालयीन प्रतिनिधींनी भद्रकाली पोलिसांशी संपर्क साधला.

बुधवारी (ता. १४) पोलिस बंदोबस्तात प्रतिनिधींनी जागेचा ताबा विश्वस्तांकडे दिला. तत्पूर्वी त्या कुटुंबाच्या घरातील वस्तूंचा अधिकृत पंचनामा करण्यात आला. पंचनामा झाल्यानंतर घरातील सर्व वस्तू बाहेर काढून ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विश्वस्तांना ताबा मिळताच त्यांनी त्या जागेवरील घराचे संपूर्ण अतिक्रमण काढून घेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत घराचे अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते.

Court representative, Bhadrakali Police handing over possession of premises to Shahi Masjid Trustees.
Nashik Bribe Crime : NMCच्या लाचखोर तांत्रिक सहायकास अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com