esakal | राष्ट्रवादीच्या बैठकीत गटबाजीवर चालले मंथन
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

राष्ट्रवादीच्या बैठकीत गटबाजीवर चालले मंथन

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव : जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून नियुक्त अविनाश आदीक (Avinash Adik) यांच्या उपस्थितीत आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) बैठकीत गटबाजीवरच (Factionalism) मंथन झाले. अखेरीस, पक्षात कोणत्याही व्यक्तीसाठी काम करू नका, पक्षासाठी काम करा, गटबाजी टाळा, असे सांगण्याची वेळ आदीक यांच्यावर आज आली.
(jalgaon ncp meeting factionalisam above discussion took place)

हेही वाचा: कोरोनाचा आलेख झुकतोय नीचांकी पातळीकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक अविनाश आदिक बुधवारपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरूवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महानगर आणि ग्रामीणचा आढावा घेतला. या वेळी बैठकीत आदीकांसमोरच पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत गटबाजीचे दर्शन घडवले.


कार्यकर्त्यांना भरला दम
आदिक म्हणाले की, जाहीरपणे आम्ही आढावा कसा घेणार आहोत. आढावा ही पक्षांतर्गत बाब असते. तसेच जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अजित पवार यायच्या आत हे सर्व दुरूस्त करा, असे त्यांनी सुनावले.

यांची होती उपस्थिती
या वेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रवक्ते योगेश देसले, सरचिटणीस नामदेव पाटील, विकास पवार, वाल्मिक पाटील उपस्थित होते. महिला शहराध्यक्ष मंगला पाटील यांनी शहरात केलेल्या कामांचा आढावा घेतला. या वेळी कार्यकर्त्यांनी पक्षात असलेल्या गटबाजीबद्दल उघडपणे आपली मते मांडली.

हेही वाचा: बैलगाडीसह शेतकरी दांपत्य नाल्याच्या पुरात गेले वाहून

अजित पवार संपर्कप्रमुख
आदीक म्हणाले, अजित पवार हे जिल्ह्यात संपर्क प्रमुख म्हणून येणार आहे. ते येण्याच्या आधी या सर्व सेल कार्यरत करा. जिथे अडचणी आहेत, त्या सर्व दुरूस्त करा, पुढच्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करा, अशा सूचना यांनी केल्या.

देवकर, ॲड. पाटील यांचे फोटो नाहीत
राष्ट्रवादी महानगरच्या बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षात सुरू असलेल्या गटबाजीकडे लक्ष वेधले. बैठकीसंदर्भात लावलेल्या बॅनरवर जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचादेखील फोटो नाही, हे कार्यकर्त्यांनी निर्दशनास आणून दिले. तसेच विद्यापीठात विविध कामांसाठी पाठबळ मिळत नसल्याची तक्रार देखील काहींनी केली.

loading image