esakal | कोरोनाचा आलेख झुकतोय नीचांकी पातळीकडे
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोनाचा आलेख झुकतोय नीचांकी पातळीकडे

sakal_logo
By
टीम ई सकाळ


जळगाव :
जिल्ह्यातील कोरोना (corona) संसर्गाचा आलेख आता नीचांकी पातळीकडे झुकू लागला आहे. गुरुवारी चार तालुक्यांतून अवघ्या ७ नव्या बाधितांची (new corona patient) नोंद झाली, तर ५० रुग्ण बरे झाले. आता सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या दीडशेच्या आत आली आहे.

(jalgaon district new corona patient graph down)

हेही वाचा: महामार्गावरील या ढाब्यांवर नक्की जा आणि जेवणाचा आनंद घ्या


जळगाव जिल्ह्यात मे महिन्यापासून उतरत चाललेला कोरोना संसर्गाचा आलेख जुलैत झपाट्याने खाली आला. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा दररोज वाढताच आहे. बुधवारी आतापर्यंतच्या सर्वांत कमी ५ रुग्णांची नोंद झाल्यानंतर गुरुवारी ३७२५ चाचण्यांच्या अहवालातून अवघे ७ बाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार ४८७ झाली आहे. दिवसभरात ५० रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३९ हजार ७६७वर पोचला असून हे प्रमाण ९८.१ टक्के आहे.तरुणाचा मृत्यू
सलग चार दिवस जिल्ह्यात एकाही मृत्युची नोंद नव्हती. मात्र, गुरुवारी भडगाव तालुक्यातील ३६ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. जळगाव शहरात १, यावल १, चाळीसगाव ४ व पारोळा १ असे रुग्ण आढळून आले. अन्य सर्व तालुक्यांत एकही रुग्ण समोर आला नाही. भडगाव तालुक्यात आता केवळ १ सक्रिय रुग्ण आहे.

हेही वाचा: शेतकऱ्याने दोनच महिन्यात टरबुजातून कमवीले साडे दहा लाख रुपये!


शहरात आज लसीकरण
जळगाव शहरातील आठ केंद्रांवर शुक्रवारी (ता.१६) लसीकरण होईल. यात शाहू महाराज हॉस्पिटल, शिवाजीनगरातील डी.बी. जैन, कुंभारवाड्यातील शाहीर अमर शेख हॉस्पिटल, पिंप्राळ्यातील मनपा शाळा क. ४८, का.उ. कोल्हे विद्यालय, पंचमुखी हनुमान मंदिरामागील नानीबाई अग्रवाल हॉस्पिटल, निमखेडी रोडवरील कांताई नेत्रालय या केंद्रांवर १८ वर्षावरील नागरिकांना कोविशील्डचा फक्त दुसरा डोस दिला जाणार आहे. तर चेतनदास मेहता हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस मिळू शकेल.

loading image