Jalgaon Municipality News : गोलाणी, नवीन बी. जे. मार्केटमधील आठ गाळे सील; महापालिकेची धडक कारवाई

Jalgaon News : शहरातील नवीन बी. जे. मार्केट, गोलाणी मार्केटमधील आठ गाळे महापालिकेने थकबाकीपोटी सील केले आहेत.
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporation esakal

Jalgaon News : शहरातील नवीन बी. जे. मार्केट, गोलाणी मार्केटमधील आठ गाळे महापालिकेने थकबाकीपोटी सील केले आहेत. यापुढे थकबाकी भरली तरीही गाळ्यांचे सील उघडण्यात येणार नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहरातील नवीन बी. जे. मार्केट, गोलाणी मार्केट, मीनाताई ठाकरे मार्केट, उर्दू शाळेजवळील मार्केटमधील गाळेधारकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. (Jalgaon New B. J. Eight shops seals in market Municipal strike action)

मात्र, गाळेधारकांना वारंवार आवाहन करूनही गाळेधारक थकबाकीचा भरणा करत नसल्यामुळे अशा गाळेधारकांचे गाळे सील करण्याची कारवाई महापालिकेच्या मार्केट वसुली विभागाकडून सुरू आहे. मंगळवारी (ता. २) शहरातील नवीन बी. जे. मार्केटमधील पाच, तर गोलाणी मार्केटमधील तीन, असे एकूण आठ गाळे सील केले आहेत. (latest marathi news)

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Lok Sabha Constituency : शिवसेना ठाकरे पक्ष भाजपसमोर उभे करणार कडवे आव्हान

नवीन भाडे करार

महापालिकेकडून वारंवार थकबाकी भरण्याचे आवाहन करूनही गाळेधारकांकडून थकबाकीचा भरणा केला जात नसल्यामुळे महापालिकेच्या मार्केट वसुली विभागाने गाळे सील करण्याची कारवाई केली.

गाळे सील झाल्यानंतर गाळेधारकाने थकबाकी भरण्यास तयारी दर्शविली, तरी आता गाळ्यांचे सील उघडण्यात येणार नसून, गाळ्यांचा लिलाव पद्धतीने नवीन भाडे करार केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : जळगावच्या फुलांची पारोळ्यात विक्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com