Jalgaon News : जळगावच्या फुलांची पारोळ्यात विक्री

Jalgaon News : जितेंद्र अशोक बारी यांनी फुल विक्रीतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
Jitendra Bari while selling flowers in the market.
Jitendra Bari while selling flowers in the market.esakal

पारोळा : येथील जितेंद्र अशोक बारी यांनी फुल विक्रीतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जितेंद्र बारी ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा देत असून, त्यांच्या या व्यवसायामुळे कुटुंबाला मोठा हातभार लागला आहे. कौटुंबिक परिस्थिती मध्यमवर्गीय असताना, दहावीनंतर पुढे काय, असा प्रश्न जितेंद्र बारी याला पडला. मात्र, ‘भगवान के घर देर है, मगर अंधेर नही ’ या म्हणीप्रमाणे शहरातील मोतीलाल बारी यांनी जितेंद्र बारीला जळगाव येथे फुल विक्री कर, असे सांगितले. (Jalgaon Sale of Jalgaon flowers in Parole)

त्यावरून जितेंद्र बारीने तब्बल चार ते पाच वर्ष नातेवाइकांकडे राहून फुल विक्री केली. त्यानंतर पारोळा शहरात सायकलीवर फुलांची माळ विक्रीतून जितेंद्र बारीने स्वतःची ओळख निर्माण केली. दुपारनंतर नागीनची पाने, केळीचे खांब, फुलांची माळ, अशा विक्रीतून त्यास रोजचे चारशे ते पाचशे रुपये मिळू लागले. त्यामुळे दहावी शिकलेला जितेंद्र बारीचा आपल्या एकत्र कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

येथील बारी समाजाच्या पान विक्री मुख्य व्यवसाय आहे. त्याला फुल विक्रीचा जोड देत तब्बल २० ते २२ लोकांना रोजगार मिळाला आहे. शहरातील फुल विक्री करणारे दुकानदार जळगाव व धुळे येथून फुल विकत घेऊन ते पारोळ्यात घाऊक दराने विकतात. लग्नसराईत फुलांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. (latest marathi news)

Jitendra Bari while selling flowers in the market.
Jalgaon Lok Sabha Constituency : पक्षातरांतून उमेदवारीची जळगाव लोकसभेची परंपरा!

या व्यवसायातूनच ही मंडळी उदरनिर्वाह करीत असते. लग्नसराई व इतर शुभकार्यावेळेस फुलांची सजावट करतेवेळी फुलांना मोठी मागणी असते. त्यातून जास्तीचे पैसे मिळत असल्याचे जितेंद्र बारी यांनी सांगितले. नवरात्री, गणशोत्सव व श्रावण मासात फुल विक्रीत मोठी तेजी असते. केळीचे खांब व पाने, नागिनची पाने, कमळ या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होते.

"पूर्वीपासून वडिलांचा शेती व्यवसाय. १५ ते २० जणांचे एकत्र कुटुंब. परिवाराला हातभार लागावा, यासाठी दहा वर्षांपासून फुल विक्री करीत आहे. यामुळे स्वतःला रोजगार मिळाल्याने आपण समाधानी आहोत." -जितेंद्र बारी, फुल विक्रेता, पारोळा

Jitendra Bari while selling flowers in the market.
Jalgaon Lok Sabha Constituency : शिवसेना ठाकरे पक्ष भाजपसमोर उभे करणार कडवे आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com