Jalgaon News I हेडफोन घालून रुळ ओलांडताना रेल्वेनं उडवलं; नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon

स्नेहलचा हाकनाक जीव गेल्याने जळगावकर हळहळ व्यक्त करत आहेत.

हेडफोन घालून रुळ ओलांडताना रेल्वेनं उडवलं; नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडणं तरुणीला जीवावर बेतलं आहे. रेल्वेचा धक्का लागल्याने या २० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. स्नेहल उजेनकर असं या तरुणीचं नाव असून ती शहरातील काळे नगर परिसरात राहत होती. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. स्नेहलचा हाकनाक जीव गेल्याने जळगावकर हळहळ व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल एका खासगी दुकानात कामाला होती. ती नेहमीच कानात हेडफोन घालते. काल काम आटोपून ती घरी जात होती. यावेळी शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडताना तिथे अंधार असल्याने आणि कानात असलेल्या हेडफोनमुळे तिला समोरुन येणाऱ्या रेल्वेचा आवाज आला नाही. रेल्वे रुळ ओलांडत असताना सुरत-भुसावळ पॅसेंजरची तिला जोरदार धडक बसून ती फेकली गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: 'विकासाच्या नावाखाली जनतेला गूळ दाखवण्याची पवारांची जुनी परंपरा'

मृत्यूनंतर हेडफोन तिच्या कानात आढळून आल्याने रेल्वेच्या धक्क्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, स्नेहल उजेनकर या तरुणीचा काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. परंतु तिचा रेल्वेच्या धडकेत अपघाती मृत्यू झाल्याने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लग्नानंतर स्नेहलचे गेल्या काही महिन्यांपासून नवऱ्यासोबत वाद सुरु होते. जेव्हा ही घटना घडली त्यावेळी ती तिच्या नवऱ्यासोबतच बोलत असावी. त्यांच्यामधील वादात आलेल्या मानसिक तणावात तिला रेल्वे आल्याचं लक्षात आलं नसावं. ती नेहमी हेडफोन वापरत असली तरी ती एकाच कानात वापरत होती. त्यामुळे हेडफोनमुळे घटना झाल्यापेक्षा पतीच्या वादात आलेल्या तणावात हे घडलं असेल असा अंदाचाजी माहिती तिच्या आईने दिली आहे.

हेही वाचा: "विषय संपला"; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचा पूर्णविराम

या पिरसरात रेल्वे प्रशासनातर्फे फूट ओव्हर ब्रिज विविध ठिकाणी बांधण्यात आले आहेत. तरीही अनेकदा नागरिक या फूट ओव्हर ब्रिजचा वापर न करता वेळ वाचवण्यासाठी थेट रुळ ओलांडून पलिकडे पोहोचतात. पण याच दरम्यान अपघात होतो आणि प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागतात. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे स्थानकात उद्घोषणेमार्फक वारंवार केलं जातं. जनजागृती करुनही याकडं वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने अशा घटना घडत असल्याचे सांगितले जातं आहे.

Web Title: Jalgaon News 20 Year Lady Died In Railway Line Crossing Wearing Earphones

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top