Sanjay Raut on Sambhajiraje | "विषय संपला"; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचा पूर्णविराम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut on Nagpur Visit
"विषय संपला"; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचा पूर्णविराम

"विषय संपला"; संभाजीराजेंच्या उमेदवारीवर राऊतांचा पूर्णविराम

संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीचा विषय शिवसेनेच्या दृष्टीने संपला, असं ठाम विधान संजय राऊत यांनी केलं आहे. शिवसेनेच्या एका जागेवर उमेदवारी हवी असेल तर संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र संभाजीराजेंनी त्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापुरातल्याच दुसऱ्या नेत्याला उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यावरून आता चर्चा आणि तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (Sanjay Raut on Sambhajiraje Chhatrapati)

हेही वाचा: राज्यसभेत उमेदवारी मिळणारे शिवसैनिक संजय पवार आहेत तरी कोण?

माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, आमच्याकडून संभाजीराजेंचा विषय संपला आहे. मराठा संघटना संजय राऊत आणि शिवसेनेला हे महागात पडेल अशा धमक्या देत आहे. पण संजय राऊतांचा या गोष्टींशी व्यक्तिगत संबंध काय? शिवसेनेचा तरी काय संबंध? जे अशा धमक्या देत आहेत, त्यांनी मागच्या काही दिवसांतल्या घडामोडींचा अभ्यास करावा.

हेही वाचा: राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजे २०२४ च्या निवडणुकीच्या शर्यतीत?

संभाजीराजेंचा सन्मान म्हणूनच आम्ही त्यांना शिवसेनेच्या कोट्यातली जागा द्यायला तयार झालो, असं सांगताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेनेच्या कोट्यातली जागा संभाजीराजेंना द्यायला तयार झालो, तो त्यांचा सन्मान म्हणूनच. यापेक्षा शिवसेना काय करू शकते? ४२ मतं आम्ही त्यांना द्यायला तयार होतो. आमची अट नाही पण भूमिका एवढीच की तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा. राजकीय पक्षात छत्रपती घराण्यातलं कोणी जात नाही हा समर्थकांचा दावा योग्य नाही. संभाजीराजेंना पक्षाचं वावडं असण्याचं कारण नाही. राजघराण्यातले अनेक जण विविध राजकीय पक्षांमध्ये आले आहेत, पक्षांकडून लढले आहेत. सिनियर शाहू महाराजही शिवसेनेत आले होते

Web Title: Sanjay Raut On Shivsena And Sambhajiraje Chhatrapati Rajyasabha Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaSanjay Raut
go to top