Jalgaon Crime News : बैलगाडा शर्यतीत बैलांना क्रुरअमानुष वागणूक

Jalgaon Crime News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषांची तमा न बाळगता तसेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता मेहरुण गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे आढळून आले आहे.
Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषांची तमा न बाळगता तसेच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता मेहरुण गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात आयोजकांपैकी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bullock cart race)

बैलगाडा शर्यतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली असून या शर्यतीचे आयोजन करण्यासाठी किमान पंधरा दिवसाअगोदर जिल्‍हा प्रशासनाचे प्रमुख जिल्‍हाधिकारी यांची रीतसर परवानगी घेणे अपेक्षीत आहे.

मात्र आयोजकांनी तसे न करता मेहरुण गाव शिवारातील उजाड कुसुंबा येथे शुक्रवार (ता.१६) रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यतीसाठी साठ स्पर्धकांनी आपापल्या बैल जोडीसह गाड्या सहभागी केल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शर्यतींचे उद्घघाटन करण्यात येऊन बैलगाडाशर्यत बघण्यासाठी हजारोंचा जमाव लोटला होता.

अनेक वर्षांचा खंड

पशू वैद्यकीय अधिनियमानुसार आजवर बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यावर बंदी होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना व नियमांचे अनुपालन अपेक्षित आहे. वीस वर्षानंतर अशा प्रकारच्या शर्यतीचे जळगाव शहराजवळच कुसुंबा येथे आयेाजन करण्यात आले होते. शर्यत संपल्यावर दुसऱ्याच दिवशी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Crime
Nashik Bribe Crime : लाचखोर कंत्राटी वीज तंत्रज्ञान कर्मचाऱ्यास अटक; लाचलुचपतच्या पथकाची येवल्यात कारवाई

पशुवैद्यकांची तक्रार

जिल्हा पशू वैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी डॉ.गणेश भांडारकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तसेच शर्यतीत सहभागी बैलांना अमानुषपणे क्रूर वागणूक देऊन बैलांच्या तसेच शर्यत पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांच्या जीवितास धोका होईल.

असे वर्तन केल्याचे आढळून आल्यावरून आयोजक वैभव युवराज सानप, विवेक वासुदेव सानप, प्रणव हरिचंद्र गवळी, संकेत सोपान महाजन यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. उपनिरीक्षक नीलेश गोसावी तपास करीत आहेत.

पोलिस परवानगीबाबत अनभिज्ञ

बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यासाठी रीतसर पंधरा दिवसांआधी जिल्‍हाधिकारी कार्यालयाची परवानगी अपेक्षित आहे. तद्नंतर संबंधित जिल्‍हा पशुवैद्यक विभागातर्फे शर्यतीत सहभागी होणाऱ्या बैलाच्या जीवितास धोका होणार नाही, ते सदृढ निरेागी बैलं असल्याची खात्री होवुन बैलांना कुठलेही मादकद्रव्य किंवा तत्सम पदार्थांचे सेवन केले जाणार नाही.

याची शासकीय यंत्रणेद्वारे खात्री करणे अपेक्षित असताना केवळ एमआयडीसी पोलिसांना लेखी पत्र देत शर्यत आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलिस परवानगी असल्याचे संबंधितांचे म्हणणे असून इतर परवानग्या घ्यावा लागतात, या बाबत माहितीच नसल्याचे सांगण्यात आले.

Crime
Pune Crime News : बाराशे कोटींचे मेफेड्रोन जप्त ; पुण्यातील विश्रांतवाडी, दौंडमधील कुरकुंभ येथे कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com