Jalgaon News : ...अखेर त्याने मृत्यूशी झुंज जिंकली! कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर बालक आईच्या कुशीत परतले

Jalgaon News
Jalgaon News esakal
Updated on

जळगाव : ममुराबाद रोडवरील उस्मानिया पार्क परिसरात तीन वर्षीय मोहंमद फैज याच्यावर मोकाट कुत्र्यांच्या टोळीने हल्ला चढवला. मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याने गंभीर जखमी बालक जिल्‍हा रुग्णालयात दाखल होता. तब्बल १५ दिवस त्याच्यावर शर्तीचे प्रयत्न करून डॉक्टरांच्या पथकाने त्याचे प्राण वाचविले.

Jalgaon News
Jalgaon Crime News : 10 वर्षांची कमाई चोरल्याने घर घेण्याचे स्वप्न भंगले!

उस्मानिया पार्क भागात २२ डिसेंबरला सायंकाळी मोहंमद फैज अंगणात खेळत असताना, आठ ते दहा कुत्र्यांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढविला. कुत्र्यांनी लचके तोडून त्याला रक्तबंबाळ केले. मुलाची अवस्था पाहून अवसान गळालेल्या पालकांनी त्याला जिल्‍हा रुग्णालयात नेले. तपासणीत बालकाच्या दोन्ही किडन्यांनाही गंभीर इजा झाल्याचे आढळून आले.

मोहंमद फैज एकुलते आपत्य असल्याने त्याच्या आईलाच सांभाळाची जबाबदारी कुटुंबावर आली. जिल्‍हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि नर्सेसने प्रयत्नांची पराकाष्ठा करून या बालकाचे प्राण वाचवले.

Jalgaon News
Jalgaon News : वयोवृद्ध पित्याच्या शेतावर फिरवला रोटावेटर; मालमत्तेच्या हिस्यावरुन मुलाचा प्रताप

मोठ्ठी चाकलेटसह खेळणेही

२० दिवस जखमी चिमुरडा मोठ्या संकटातून सुखरूप बचावल्यानंतर त्याची सुटी होताना डॉ. मिलिंद चोरडीया, डॉ. पोटे, डॉ. किरण, डॉ. नेहा यांच्या टीमने फैजला भली मोठ्ठी चॉकलेट आणि खेळणी देत निरोप दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

stray dog attack
Stray dogs roam the streets in Pachod, raising safety concerns among residents.
Solapur child dies due to rabies
Horrific Stray Dog Attack in Wagholi: Six-Year-Old Suffers Serious Neck Injuries
Marathi News Esakal
www.esakal.com