Jalgaon Dam Construction : पाडळसे, शेळगाव प्रकल्पांचे भाग्य उजळो! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Dam Construction

Jalgaon Dam Construction : पाडळसे, शेळगाव प्रकल्पांचे भाग्य उजळो!

भडगाव : गिरणा नदीवरील प्रकल्पाची गत आहे, तीच तापीवरील पाडळसे आणि शेळगाव प्रकल्पांची आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळून २५ वर्ष झाले, मात्र त्यात पाणी अडायला तयार नाही. शेळगाव बॅरेजमध्ये पाणी अडवायला सुरवात झाली आहे, मात्र अद्याप उपसा सिंचनला मंजुरीची प्रतीक्षा आहे. पाडळसे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तब्बल २ हजार २०० कोटीची आवश्यकता. जळगाव जिल्ह्य़ातील तापीवरील हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास हतनूरमधून ओव्हरफ्लो होणारे पाणी अडून जवळपास ७० किलोमीटरपर्यंत पाणी तापी पात्रात कायस्वरूपी थांबणार आहे.

गिरणा नदिवरील बलून बंधाऱ्यांना ३० वर्ष झाली तरी ते प्रत्यक्षात जमिनीवर यायला तयार नाही. तापीवरील प्रकल्पांना सुरू करण्यापुरता निधी मिळाला आहे. मात्र पुरेशा निधीअभावी २५ वर्ष झाले तरी ते पूर्णत्वास यायला तयार नाही. त्यामुळे हतनूर व्यतिरिक्त तापीचे पाणी कुठे अडविले जात नाही. पर्यायाने ते पाणी गुजरातेत वाहून जाते ही खरी शोकांतिका आहे.

हेही वाचा: Suresh Jain : ‘होम ग्राउंड’, उखडलेली खेळपट्टी अन् 360 अंशांतून बदललेले राजकारण

'पाडळसे'ला निधी मिळेना

तापीवर पाडळसे येथे १९९७-९८ मधे प्रकल्पाला मान्यता मिळाली. मात्र आज या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळून तब्बल २५ वर्ष होतायेत तरी प्रकल्पात पाणी अडविता आले नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २२०९ कोटीचा निधी अपेक्षित आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर ५४१ कोटी खर्च झाला आहे. या प्रकल्पात ४२० दलघमी एवढे पाण्याची साठवणूक होणार आहे तर ५४ हजार ९३६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाचा पंतप्रधान सिंचाई व बळीराजा सिंचाई योजनेतही सामावेश करण्यात आला आहे. आता या प्रकल्पाला निधीची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा: Hatnur Dam : हतनूर धरणात गाळाचे साम्राज्य; क्षमतेच्या 50 टक्के गाळ

शेळगावला 'उपसा' ची प्रतीक्षा

शेळगाव प्रकल्पालाही १९९७-९८ मधे प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र तो पूर्णत्वास यायला तब्बल २५ वर्ष लागली. सद्य:स्थितीत प्रकल्पात ३० टक्के पाणी अडविण्यात आले आहे. पुढच्यावर्षी पूर्ण क्षमतेने पाणी अडविले जाणार आहे. मात्र या पाण्याचा प्रत्यक्ष सिंचनासाठी फायदा होणार नाही. कारण अद्याप उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळालेली नाही. राज्य शासनाकडून मंजुरीची प्रतीक्षा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून ११ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनाला गती देणे आवश्यक आहे. (क्रमशः)

प्रकल्पाच्या पूर्णत्वाअभावी पाणी वाया

तापीवरील जळगाव जिल्ह्यातील शेळगाव आणि पाडळसे हे दोन्ही प्रकल्प महत्वाचे आहेत. यातून तापीकाठ समृध्द होणार आहे. मात्र शासनाकडून प्रकल्पांना मंजुरी मिळून २५ वर्ष झाले तरी पुरेशा निधीअभावी प्रकल्प पूर्णत्वास येत नसेल तर ती येथील राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींसाठी लाजीरवाणी बाबा आहे. प्रकल्पाअभावी हतनूर प्रकल्पातन तब्बल १० हजार दलघमी एवढे पाणी यंदाच्या पावसाळ्यात वाहून गेले. आता तरी लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

प्रकल्प दृष्टीक्षेपात

पाडळसे प्रकल्प

- प्रकल्पाला मान्यता...१९९७-९८

- आवश्यक निधी..२२०९ कोटी

- क्षमता...४२० दलघमी

- लाभक्षेत्र...५४९३६ हेक्टर

-----------

हेही वाचा: Jalgaon News : हक्काचे पाणी गेले वाहून; आश्वासने अन् लालफितीत अडकले ‘बलून’

शेळगाव प्रकल्प

- प्रकल्पाला मान्यता..१९९७-९८

- उपसा सिंचनला मान्यता मिळून निधीची आवश्यकता

- क्षमता..१२७ दलघमी

- लाभक्षेत्र..११ हजार हेक्टर

टॅग्स :Jalgaondam