Suresh Jain : ‘होम ग्राउंड’, उखडलेली खेळपट्टी अन् 360 अंशांतून बदललेले राजकारण

Suresh Jain
Suresh Jainesakal

जळगावातील घरकुल गैरव्यवहार प्रकरणात सुरेशदादा जैन यांना गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला. न्यायालयीन प्रक्रियेतील ही नियमित घटना असली, तरी त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये ‘हत्तीचे बळ’ संचारलेय. जळगावात नेतृत्व करण्यासाठी जैन सज्ज असल्याचा दावा त्यांचे समर्थक करीत असले, तरी त्यातही अनेक न्यायालयीन व तांत्रिक अडचणी असल्याचे दिसते. या अडचणी दूर होतीलही, पण ‘होम ग्राउंड’ असले तरी जळगावच्या राजकीय मैदानातील बाजीसाठी जैनांना बरीच ‘नेट प्रॅक्टिस’ करावी लागेल.

Suresh Jain
Jalgaon Politics : महाजन, पाटलांचे आव्हान खडसे मोडीत काढणार?

१९८० ते २०१० अशा सलग तीन दशकांच्या काळात सुरेशदादा जैन या नावाने जळगाव शहर व जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व राखले. अल्पसंख्य समाजाचे असूनही सर्वसमावेशक राजकारणामुळे त्यांनी जळगाव पालिकेवरच नव्हे, तर कृषी उत्पन्न बाजार समिती, दूध संघ, जिल्हा सहकारी बँक अशा सहकारी संस्थांवरही आपले वर्चस्व निर्माण केले आणि हे वर्चस्व अनेक वर्षे अबाधितही राखले.

Suresh Jain
Jalgaon Politics : आयुक्तांच्या बदलीमागे राजकीय खेळी?

जळगाव शहराचे ते अनभिषिक्त सम्राट म्हणूनच वावरले. त्यामुळे शहराचे नेतृत्व करताना त्यांचा शब्द ‘प्रमाण’ होता. त्यातूनच पालिकेने अनेक मोठ्या योजना राबविल्या, प्रकल्प उभारले. हे प्रकल्प उभारताना अनेकदा ‘आउट ऑफ वे’ जाऊन काही निर्णय घ्यावे लागले आणि या ‘वेगळ्या’ मार्गानेच सुरेशदादांसमोर मोठ्या अडचणी निर्माण केल्या. घरकुल योजनेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार हा त्याचाच भाग. २००६ मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल होणे, २०११ ला त्याचा नव्याने तपास सुरू होणे आणि २०१२ मध्ये मूळ गुन्ह्यात नाव नसताना सूत्रधार म्हणून दादांना अटक होणे. या काळ्या घटनाक्रमातून दहा वर्षांनंतर त्यांना नियमित जामीन मंजूर झाला असला, तरी त्यांच्यासमोरील अडचणींना पूर्णविराम मिळालेला नाही.

हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

मुळात, घरकुल प्रकरणात जैन यांच्यासह सुमारे ९० जणांवर गुन्हा दाखल होऊन, पैकी बहुतांश जणांना शिक्षाही सुनावली आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर वगळता अन्य कुणाच्याही शिक्षेला कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली नाही किंवा शिक्षा रद्दही झालेली नाही. स्वतः जैन यांना सात वर्षे कैद व १०० कोटींच्या दंडाची शिक्षा आहे. देवकरांच्या शिक्षेला मिळालेल्या स्थगितीच्या धर्तीवर जैन यांनाही अशाप्रकारचा दिलासा मिळू शकतो, असे त्यांच्या समर्थकांना वाटते. त्यातूनच ही मंडळी ‘दादांची प्रतीक्षा संपली’, असा दावा करत त्यांच्या जळगावातील व पर्यायाने राजकारणातील पुनरागमनाची तयारी करताहेत.

Suresh Jain
Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात सुरेशदादा इज बॅक...; भूमिकेबाबत समर्थकांना प्रतीक्षा

सद्य:स्थितीत शिक्षेच्या अडचणीमुळे कुठलीही निवडणूक लढवू शकत नसले, तरी महापालिका निवडणुकीचे नेतृत्व ते नक्कीच करू शकतात. जळगावची गेल्या दहा वर्षांत काय स्थिती झाली, ते सर्वश्रुत आहे. त्यामुळे जळगावच्या भल्यासाठी ‘पुन्हा दादाच’, असा नारा देऊन त्यांची समर्थक मंडळी रान पेटवू शकते. दहा वर्षांत बदललेल्या नेतृत्वाचा अनुभवही जळगावकरांनी घेऊन पाहिलाय, म्हणून ‘दादाच बरे होते’, असे म्हणत जळगावकरही त्याच्यावर विश्‍वास दर्शवू शकता.

गेल्या काही वर्षांत, विशेषतः २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील व जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ३६० अंशांमधून इतकी बदलली, की श्री. जैन यांना येणाऱ्या काळात राजकारण करायचे असेल, तर काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल. सध्याची राजकीय स्थिती बघता, सुरेशदादांना जामीन मिळाल्यानंतर पालिकेत नेतृत्व करणाऱ्या ठाकरे गटाशिवाय अन्य कुणीही त्यांचे स्वागत किंवा जल्लोष केलेला नाही.

Suresh Jain
Jalgaon Milk Union Election : 2 मंत्री, आमदार, माजी आमदारांची काट्याची लढत

ठाकरे गटातूनही जळगावच्या आमदारकीची स्वप्ने पाहत त्यासाठी मशागत करणारे मनापासून दादांचे स्वागत करतील, असे वाटत नाही. जैनांचे गिरीश महाजनांशी सख्य असले आणि आताच्या शिंदे गटातही त्यांना मानणारे अनुयायी असले, तरी त्यापैकी कुणीही त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे जळगावातून नव्याने राजकीय ‘इनिंग’ सुरू करताना दादांचे ‘होम ग्राउंड’ असले, तरी जळगावातील रस्त्यांप्रमाणेच ही राजकीय खेळपट्टीही बऱ्यापैकी उखडली आहे, हे दस्तुरखुद्द दादाही जाणून आहेतच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com