ग्रामस्‍थांनी रात्र काढली जागून..ढगफूटीसारखा पाऊस

ग्रामस्‍थांनी रात्र काढली जागून..ढगफूटीसारखा पाऊस, वीज कोसळून बैलजोडी ठार
Cloudburst satpuda mountain
Cloudburst satpuda mountainsakal

यावल (जळगाव) : तालुक्यातील चुंचाळे- बोराळे गाव परिसरात सोमवारी सायंकाळी उशिरा विज कोसळली व ढगफुटी सदृश्य मुसळधार (Cloudburst and heavy rain satpuda mountain) पाऊस झाल्याने एक बैलजोडी मृत्यूमुखी पडली. तर पुराच्या पाण्यात दोन मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. पावसाचा जोर अधिक असल्याने दोघं गावातील ग्रामस्थ घरात पाणी शिरू नये; म्हणून रात्री उशिरापर्यंत जागीच होते. (Satpuda-mountain-aria-Cloudburst-and-heavy-rain-two-Bull-death)

Cloudburst satpuda mountain
वायरमनचा मारहाणीत मृत्‍यू; कारवाईबाबत नितीन राऊत यांचे व्‍टीट

चुंचाळे व बोराळे गावास जोडणाऱ्या नदीला १५ वर्षानंतर मोठा पूर आला होता. यामुळे रात्री उशिरापर्यंत दोघ गावांचा संपर्क तुटला होता. तर एका ठिकाणी विज कोसळुन दोन बैलांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान महसूल विभागाने आज नुकसानी संदर्भात पंचनामा (Revenue department today panchnama regarding the loss) केला असून यात एक बैलजोडी वीज पडून ठार झाल्याचे म्हटले आहे.

२००६ नंतर प्रथमच नदीला पुर

यावल तालुक्यातील पश्चिम क्षेत्रात असलेल्या चुंचाळे व बोराळे या गाव परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस झाला. दोघ गावांना जोडणाऱ्या नदीला सुमारे २००६ नंतर अशा प्रकारचे मोठे पुर आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Cloudburst satpuda mountain
४४ वर्षांपासून विनामूल्य सेवा; ८७ व्‍या वर्षीही योगसाधकांचे उत्‍तम गुरू

विज कोसळली

जोरदार पाऊस व विज कोसळल्याने बोराळे गावातील शेतकरी सुरेश प्रल्हाद धनगर यांच्या घरासमोर बांधलेल्या दोन बैलांच्या अंगावर विज कोसळयाने सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीच्या दोन बैलांचा मृत्यु झाला. याशिवाय संजयसिंग राजपुत व रमेश पितांबर धनगर यांच्या १ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटरसायकली देखील पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचे वृत्त आहे.

सातपुडा परिसरात ढगफुटी

चुंचाळे– बोराळे गावांच्या उत्तरेकडील असलेल्या सातपुडा पर्वताच्या जवळील निंबादेवी तलावाच्या परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. परिसरात सुमारे चार तास सुरू असल्याने पावसाने गावातील नदीला मोठा पुर आल्याने दोघ गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान महसूल प्रशासकीय यंत्रणेकडून नुकसानीचे पंचनाम्याचे काम आज आटोपले असून यात घरांचे वा पिकांचे नुकसान झाले नसले तरी वीज कोसळून बैलजोडी ठार झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com