Jalgaon News : चाळीसगावात लवकरच स्वतंत्र ‘आरटीओ’ कार्यालय

शहरात स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी शासन दरबारी केली होती.
RTO
RTO esakal
Updated on

Jalgaon News : शहरात स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करावे, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी शासन दरबारी केली होती. या मागणीला मंजुरी मिळाली असून लवकरच या ठिकाणी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कार्यान्वित होणार आहे. ज्यामुळे सध्या असलेला ‘एम. एच. १९’ हा क्रमांक बदलला जाणार आहे. दरम्यान, या कार्यालयामुळे जळगावला कराव्या लागणाऱ्या फेऱ्या वाचणार असल्याने नागरिकांनी आमदार चव्हाण यांना धन्यवाद दिले आहेत. (Separate RTO office in Chalisgaon soon)

जळगावसह छत्रपती संभाजीनगर, नाशिक व धुळे या चार जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव तालुक्यातील वाहनधारकांना नवीन वाहनांचा परवाना काढण्यासाठी जळगावला जावे लागते. ‘आरटीओ’ विभागातर्फे भडगाव, पाचोरा व पारोळा येथे कॅम्प घेतले जात असले तरी काही ना काही कामानिमित्ताने बहुतांश वाहनधारकांना जळगावच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क करावा लागत होता.

शिवाय कॅम्पमध्ये मोठ्या‍ प्रमाणावर गर्दी होत असल्याने अनेकांची गैरसोय होत असते. त्यामुळे चाळीसगावला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.

RTO
Jalgaon Municipality News : शहरात लवकरच अतिक्रमण निमूर्लन मोहीम : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

या संदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेत, थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र देऊन संपूर्ण जिल्ह्याचा भार जळगावच्या एकमेव कार्यालयावर असल्याने चाळीसगावला उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची गरज लक्षात आणून दिली होती.

या मागणीची मुख्यमंत्री शिंदे यांनी दखल घेत, तत्काळ मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेश संबंधितांना दिले आहेत. ज्यामुळे शहरात लवकरच ‘आरटीओ’चे स्वतंत्र कार्यालय सुरु होणार आहे. हे कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर सध्या वाहनांना मिळणार ‘एम. एच. १९’ हा क्रमांक काय मिळतो, याची उत्सुकता तालुकावासीयांना लागली आहे.

RTO
Jalgaon News : जिल्ह्यात 37 हरितगृह, शेडनेट, 3 मधुमक्षिका पालन प्रकल्प ‘कागदा’वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com