Jalgaon News : नगरदेवळ्यातील तिघांची सैन्यदलात झाली निवड; गावात जल्लोषात स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

army recruitment

Jalgaon News : नगरदेवळ्यातील तिघांची सैन्यदलात झाली निवड; गावात जल्लोषात स्वागत

नगरदेवळा (ता. पाचोरा) : भारतीय सैन्यदलात निवड समितीमार्फत नुकतीच भरती प्रक्रिया झाली. यात शस्त्र सीमा दलात नगरदेवळ्यातील हरीष पाटील, रवींद्र भोई, भरत भोई या गरीब परिवारातील ती तरुणांची निवड झाल्याची माहिती मंगळवारी (ता. ८) मिळताच त्यांच्या मित्र परिवारातर्फे सायंकाळी गावातून फेटे बांधून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. ताना सांगितले.

आप्तेष्ठांच्या घरातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. या मिरवणुकीत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. मागील तीन वर्षांपूर्वी एकाच वेळी सहा तरुणांची भारतीय सैन्यदलात निवड झाली होती. अनेक तरुण जीवापाड कष्ट करून प्रयत्न करत आहेत. तीनही तरुणांचे पालक मोलमजुरी करत असल्याने त्यांच्याही आयुष्यात कमळ फुलल्याचे त्यांच्या हसतमुखाने दृष्टीस येत होते. पत्र मिळाल्यानंतर प्रशिक्षणाला जाणार असल्याचे निवड झालेल्या तरुणांनी ‘सकाळ’शी बोल