Jalgaon News : ट्रकची झाडाला धडक; चालकासह क्लीनर ठार

 accident
accidentsakal

एरंडोल : म्हसावदकडून एरांडोलकडे भरधाव येणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकने झाडास धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात ट्रकचालक, क्लीनर जागीच ठार झाले. ट्रकचा भाग झाडांच्या फाद्यांमध्ये अडकल्यामुळे क्रेनच्या मदतीने चालकाचा मृतदेह काढण्यात आला. हा अपघात गुरुवारी (ता.१) सकाळी पहाटेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील उमरदे गावाजवळ झाला.

म्हसावदकडून एरंडोलकडे सकाळी साडेपाचच्या सुमारास लोखंडी आसारी भरलेला ट्रक (एमपी ११, एच ०८५२) भरधाव येत होता. उमरदे गावाजवळ ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रकने विरुद्ध दिशेच्या बाजूला असलेल्या निंबाच्या झाडास जोरदार धडक दिली. ट्रकने झाडास धडक दिल्यांनतर ट्रकचा पुढील भाग चेपला जाऊन ट्रक पलटी झाला. अपघातात ट्रकचालक प्रकाश गंगाराम बास्कले (वय ३०) आणि क्लीनर शाहरुख खान सोहिल खान (वय १८) (दोघेही रा. धार, मध्यप्रदेश) हे ठार झाले.

 accident
Spotted Barb : वाघूर धरणात आढळेल्या या माशाने महाराष्ट्रातील मत्स्य सूचित पडली भर

या वेळी उमरदे येथील पोलिस पाटील शेखर जगताप आणि संदीप पाटील हे शेतात जात होते. त्यांच्यासमोरच ट्रकचा अपघात झाल्यामुळे त्यांनी अपघातस्थळी धावत जाऊन अपघाताची माहिती पोलिसांना दिली. तसेच ट्रकवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून ट्रकच्या मालकास अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा: वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

अपघातामुळे जोरदार आवाज झाल्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले. ग्रामस्थांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने ट्रक आणि झाडात अडकलेला चालक प्रकाश बास्कले यास बाहेर काढले तसेच गंभीर जखमी असलेल्या शाहरुख खान सोहिल खान याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

 accident
Swasthyam 2022: Sound Bath म्हणजे काय, उपचारातून होणारे ५ फायदे

अपघातग्रस्त ट्रक भरधाव येत होता. पहाटेची वेळ असल्यामुळे रस्त्यावर कोणीही नव्हते; अन्यथा भीषण दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत पोलिस पाटील शेखर जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रकचालक प्रकाश बास्कले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार काशिनाथ पाटील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com