
Swasthyam 2022: Sound Bath म्हणजे काय, उपचारातून होणारे ५ फायदे
Swasthyam 2022:
आवाज आणि आपण हे नातं फार जुनं आहे. अगदी जन्मल्यापासून खरंतर त्याआधीपासूनच आपण अनेक आवाज ऐकत असतो. अनेक आवाज आपल्या रोजच्या सवयीचे होतात. त्यांच्याशी आपलं एक नातं तयार होत असतं. आवडतं गाणं, आवडत्या माणसाचा आवाज ऐकल्यावर आपल्याला आनंद होतो. आवाजातून आनंदाबरोबर औषधही मिळालं तर?
हो हे खरं आहे. आवाजाचा वापर करून तुम्हाला शरीराच्या अनेक आजारांवर मुख्यत्वेकरून मनाच्या आजारांवर मात करता येऊ शकते. आवाजाद्वारे, ध्वनीद्वारे उपचार करण्याची ही पद्धत काही नवीन नाही. जगभरातल्या संस्कृतींमध्ये ती खोलवर रुजलेली आहे. त्यातीलच साऊंड बाथ ही नवीन उपचारपद्धती सध्या चर्चेत आहे.
तज्ञांच्या मार्गदर्शनासह त्याचा लाभ घेतलात तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळू शकतील आणि मन:शांती मिळू शकेल. (What is Sound Bath)
साऊंड बाथ म्हणजे काय ?
सर्वसाधारणपणे, ध्वनी स्नान म्हणजे साऊंड बाथ हा एक ध्यानाचाच प्रकार असतो. जेथे उपस्थित असलेले लोक ध्वनी लहरींमध्ये "स्नान" करतात. या लहरी विविध स्त्रोतांद्वारे तयार केल्या जातात. त्यामध्ये विविध वाद्यांचा तसेच उपकरणांचा समावेश असतो. गाँग, सिंगिंग बोल्स, तालवाद्य, चाइम्स, रॅटल्स, ट्यनिंग फोर्क्स तसेच मानवी आवाजाचाही समावेश असतो.
विशिष्ट संगीत
यावेळी जे संगीत ऐकवले जाते ते एका वेगळ्या पद्धतीचे असते. तुम्ही रॉक कॉन्सर्ट किंवा सिंफनीमध्ये ऐकत असलेल्या संगीताप्रमाणे ते नसते. त्याऐवजी उल्लेखनीय अनुनाद किंवा ध्वन्यर्थासह वाद्य आणि आवाजाची काळजीपूर्वक निवड केली जाते. (Sound Bath information in marathi)
उपचाराची पद्धत
साऊंड बाथदरम्यान सहभागीला पाठीवर झोपवले जाते. योगासनातील शवासनातच सहभागी व्यक्तीने झोपल्यास अधिक चांगला परिणाम मिळू शकतो. त्यानंतर साऊंड हीलिंग विषयातील तज्ज्ञ उपचारासाठी सज्ज होतात. प्रशिक्षक यावेळी वर म्हटल्याप्रमाणे विविध वाद्य आणि उपकरणांसह आवाजाची निर्मिती करतात. हे आवाज सहभागी व्यक्तीला ऐकवले जातात. काहीवेळा एकट्यासाठी तर काहीवेळा गटासाठी हे उपचार दिले जातात. मंत्रोच्चार, वाद्यांचे आवाज, उपकरणांचे आवाज याद्वारे ध्वनीची निर्मिती करून त्यातून सकारात्मक लहरी निर्माण केल्या जातात.
उपचारातून होणारे फायदे
विविध ध्वनीलहरींतून सकारात्मक उर्जा तयार होते.
आवाजातून अनुभूती मिळते
मन:शांती मिळते.
मनातील चिंता, काळज्या दूर होण्यास मदत होते.
वेदना कमी होण्यास मदत होते.
कार्यशाळेत सहभागी व्हा !
‘सकाळ माध्यम समूहा’तील 'वुई आर इन धिस टुगेदर' मोहिमेअंतर्गत ९ ते ११ डिसेंबर दरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय संपूर्ण आरोग्यासाठी 'स्वास्थ्यम्' उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात प्रियांका पटेल या ‘इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग’ कार्यशाळा घेणार आहेत. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नाव रजिस्टर करा.