
Jalgaon News : दारू पिण्यास मनाई केल्याने हॉटेलमध्ये धिंगाणा
जळगाव : तालुक्यातील आव्हाणे येथील हॉटेल मावलीत मालकाने दारू पिण्यास मनाई केल्याने वाळूमाफियांनी दीड तास धिंगाणा घातला. हॉटेल मालकासह स्वयंपाकींना मारहाण केली. ग्रामस्थांनी या तिघांची सुटका करून मारेकऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, ‘ते’ वाळूमाफिया नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: Jalgaon News : बनावट सौदा पावतीआधारे मिळकती हडपण्याचा डाव; 2 वकिलांसह 11 संशयितांवर गुन्हा
किरण पाटील (वय २६) याच्या हॉटेल मावलीमध्ये रविवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास आठ ते दहा जण आले. त्यापैकी एक-दोघांनी दारू पिण्यास सुरवात केली. हॉटेल मालक किरण पाटील याने त्यांना दारू पिण्यास मज्जाव केला. त्यावरून वादला सुरवात झाली. किरण पाटील याच्यावर सर्व तुटून पडले. दोघे स्वयंपाकी मालकाला सोडविण्यासाठी गेले. मात्र, त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. एकाने त्याच्या तावडीतून सुटून गावाच्या दिशेने धाव घेत ग्रामस्थांना घडला प्रकार सांगितला. संतप्त ग्रामस्थांनी हॉटेलच्या दिशेने धाव घेतली.
हेही वाचा: First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
हेही वाचा: Crime News : हमालाची कमाल! टोळी उभारुन आखायचा मोठ्या गुन्ह्यांचे प्लॅानिंग
या टोळक्याची ग्रामस्थांनी यथेच्छ धुलाई केली. चार पाच पळून जाण्यात यशस्वी झाले, तर तिघांना पकडून तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सायंकाळी पाचला घडलेल्या प्रकारानंतर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना संपर्क केला असता, त्यांनी फोन घेतला नाही. रात्री दहाला पोलिस ठाण्यात फोन करून माहिती घेतली असता, ठाणे अंमलदाराने असा काही प्रकार झाला नाही. तक्रारदार पोलिस ठाण्यात आला नाही, असे सांगण्यात आले.