
Flood-hit Pachora in Jalgaon district after cloudburst-like rainfall, with submerged villages, destroyed crops, and hundreds of livestock swept away.
esakal
Summary
जळगावच्या पाचोरामध्ये घाटमाथ्यावर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने महापुरस्थिती निर्माण होऊन असंख्य गावे पाण्याखाली गेली.
२५० पेक्षा अधिक गुरेढोरे वाहून गेल्याची भीती, शेतजमीन, घरे आणि दुकाने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बहुळा धरणातून मध्यरात्री मोठा विसर्ग सुरू असून मदत कार्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
राजेंद्र पाटील
पाचोरा : राज्यभरात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून जळगाव जिल्ह्यातील पाचोरामध्ये पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळाले, घाटमाथ्यावर मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पूरस्थिती निमार्ण झाली आहे. बहुळा धरणातून रात्री दीड वाजेपासून३७ हजार ४३१किव्सेसने नऊ गेट दीड मीटर ने उघडून बहुळा धरणात विसर्ग सुरू असून जोगेश्वरी, इंद्रगढी सह पिंपळगाव,सिंदाळ, राजुरी परीसरात शेती सह गुरे ढोरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.