Jalgaon Crime News : सराफ बाजार दरोडा! तिघांना 7 दिवस कोठडी; दोघा भावंडांनाही अटक

Jalgaon Crime : शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याची उकल करण्यात जळगाव पोलिसांना यश आले आहे. या दरोड्यात तीन सख्ख्या भावांना अटक केली असून, इतर तिघे फरारी झाले आहेत. अटकेतील तिघांची सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी झाली असून, दरोड्यातील मुद्देमालाबाबत संशयितांची उडवाउडवीची उत्तरे देणे सुरू आहे. (Police has succeeded in solving robbery at Saurabh Jewellers in Sarafa Bazar )

सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सच्या मागील बाजूने तीन दुचाकीवरून आलेल्या सहा दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकांना शस्त्र लावून शोरूम फोडले. तेथून ३२ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लुटून नेले. दुकानाच्या मागे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सहा संशयित कैद झाले होते. सीसीटीव्ही फुटेज, गुन्हे अन्वेषण विभागाचे नेटवर्क आणि तांत्रिक पुराव्याच्या माध्यमातून संशयिताचा थांगपत्ता लावण्यात आला.

गुन्हे शाखा, शनिपेठ पोलिसांच्या संयुक्त पथकाने पुण्यातून रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी याला ताब्यात घेतले. त्यानंतर हरिविठ्ठलनगरजवळील राजीव गांधीनगरमधून रणजितसिंग जुन्नी (वय ३२) यांचे भाऊ सागरसिंग जुन्नी (वय २५) व झेनसिंग ऊर्फ लकी जुन्नी (वय २२) यांना अटक करण्यात आली. मंगळवारी (ता. २१) तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना सोमवार (ता २७)पर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Crime
Jalgaon Crime News : प्लॉट विक्रीस नकारामुळे मुलाने केला आईचा खून; एरंडोलमधील घटना

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रभारी निरीक्षक दत्तात्रय निकम, शनिपेठचे प्रभारी निरीक्षक विठ्ठल पाटील, तपास अधिकारी पीएसआय चंद्रकांत धनके यांच्यासह गुन्हे शोध पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथके तपास करीत असून, दरोड्यात चार संशयित जळगावचे, तर दोन बाहेर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. उर्वरित तीन संशयितांचा शोध सुरू आहे.

लुटीचा माल गायब

जुन्नी बंधूंपैकी एकाने गुन्ह्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. मात्र, लुटीचा माल माझ्याकडे नाही. उडवाउडवीची उत्तरे संशयित देत आहेत. संशयित रणजितसिंग जुन्नी व त्याच्या साथीदारांनी जळगावसह, अहमदनगर, नाशिक, धुळ्यासह इतर जिल्‍ह्यातही मोठी लूट केली आहे. जळगाव सराफ बाजारात जानेवारी महिन्यात झालेला दरोडा याच टोळीने केल्याची माहिती समोर आली असून, राज्यातील इतरही गुन्हे या टोळीकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Crime
Jalgaon Crime News: जळगावातील सराफा बाजारात सशस्त्र दरोडा! 300 ग्रॅम सोने, 8 किलो चांदीसह साडेतीन लाखांची रोकड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com