crime
crimeesakal

Jalgaon Crime News : प्लॉट विक्रीस नकारामुळे मुलाने केला आईचा खून; एरंडोलमधील घटना

Jalgaon Crime : घराजवळ असलेला प्लॉट विक्रीस नकार दिल्याने मुलगा व सुनेने आईस मारहाण करून तिला ठार मारल्याची घटना रविवारी (ता. १२) पहाटे तीनच्या सुमारास केवडीपुरा परिसरातील वनिता वसतिगृहासमोर घडली.

Jalgaon Crime News : घराजवळ असलेला प्लॉट विक्रीस नकार दिल्याने मुलगा व सुनेने आईस मारहाण करून तिला ठार मारल्याची घटना रविवारी (ता. १२) पहाटे तीनच्या सुमारास केवडीपुरा परिसरातील वनिता वसतिगृहासमोर घडली. पोलिसांनी संशयित मुलगा व सुनेस अटक केली आहे. आज जागतिक मातृदिनाच्या दिवशीच मुलाने आईचा खून केल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ()

शहरातील केवडीपुरा भागातील वनिता वसतिगृहासमोर विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) (वय ६०) या पती रोहिदास मोहिते, मुलगा बापू मोहिते व सून शिवराबाई मोहिते यांच्यासह राहतात. त्यांच्या घराजवळ विमलबाई मोहिते यांचा प्लॉट असल्यामुळे त्यांचा मुलगा बापू मोहिते व सून शिवराबाई मोहिते हे दोघे जण प्लॉटची विक्री करावी, असे विमलबाई यांना वारंवार सांगत होते. विमलबाई मोहिते या प्लॉटची विक्री करण्यास नकार देत असल्यामुळे मुलागा बापू व सून हिवराबाई हे दोघे जण त्यांना शिवीगाळ करून मारहाण करीत असे.

मुलगा व सुनेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विमलबाई या काही दिवस नातेवाईकांकडे राहण्यास गेल्या होत्या. तसेच मुसळी येथील समाजबांधवांच्या घरी काही दिवस थांबल्या होत्या. त्यानंतर समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी मुलगा बापू व सून हिवराबाई यांना समजावले होते. त्यानंतर विमलबाई मोहिते या एरंडोल येथे राहण्यासाठी आल्या होत्या. आज पहाटे विमलबाई मोहिते यांच्या बहिणीचा मुलगा संजय मोहिते यांना त्यांचा मामेभाऊ राजू बेलदार यांनी मोबाईलवरून मावशी मृत झाली असल्याचे कळविले.

crime
Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीकडे बळजबरी प्रेमाची मागणी; तिघांविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल

मावशी मृत झाल्याचे कळताच विमलबाई मोहिते यांची बहिण चिलाबाई मोहिते, भाऊ संजय मोहिते, विक्की मोहिते एरंडोल येथे आले. विमलबाई मोहिते यांचा मृतदेह पाहून सर्वांनी हंबरडा फोडला. त्यावेळी विमलबाई यांच्या हनुवटीजवळ जखम दिसून आली तसेच त्यांच्या उजव्या कानातून रक्त वाहत होते. सर्वांनी मुलगा बापू बेलदार याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्यामुळे त्यांचा संशय बळावला.

याबाबत वसंत उमराव मोहिते यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा बापू मोहिते व सून हिवराबाई मोहिते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलगा बापू व सून हिवराबाई यांना अटक केली असून, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांचे सहकारी तपास करीत आहेत. आज मातृदिनाच्या दिवशीच मुलाने केवळ प्लॉटची विक्री करीत नाही, या कारणावरून आईस मारहाण करून दगडावर आपटून ठार मारल्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ केली जात असून, मुलगा व सुनेच्या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

crime
Jalgaon Crime News : मोहाडी दगडफेक प्रकरण; सरपंचाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com