Jalgaon Crime News : भुसावळात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; 6 युवती सह 2 युवक ताब्यात

Jalgaon Crime : पती- पत्नी देहविक्री व्यवसाय चालवित असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून सहा युवती सह दोन युवकांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
Crime
Crime esakal

Jalgaon Crime News : शहरातील महेश नगर भागात वर्षापासून स्पा सेंटर सुरू असून या आड पती- पत्नी देहविक्री व्यवसाय चालवित असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून सहा युवती सह दोन युवकांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

वर्षांपासून हॉटेल,लॉज तसेच शहरातील काही भागात रूम भाड्याने देऊन देहविक्री जोमाने सुरू आहे. (Jalgaon Police raid on spa center in Bhusawal 6 young women and 2 young men detained)

काही दिवसापूवी तर चक्क डीवायएसपी कार्यालयाच्या मागील बाजूस एक वयोवृद्ध महिला व पुरुष बनावट आधार कार्ड बनवून बाहेरील मुलींना देहविक्री व्यवसायासाठी आणून मोठी रक्कम कमवीत असल्याचे पुढे आले होते. या मागावर कित्येक वर्षांपासून पोलिस प्रशासन होते. अखेर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पथकाने सापळा रचून कारवाई केली.

आज रविवारी (ता. ३) भुसावळतील महेश नगर भागातील स्पा सेंटर वर छापा टाकून सहा युवती सह दोन युवक ताब्यात घेण्यात आले. पल्लवी व विशाल नामक पती पत्नी हे दोघे औरंगाबाद, बंगाल, जळगांव या गावातील युवतींच्या मदतीने स्पा सेंटरच्या आड अवैध देहविक्री व्यवसाय चालवीत होते.

Crime
Crime News: पतीला आला राग अन् गळा दाबून केली पत्नीची हत्या

पोलिसांच्या कारवाईमुळे देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याआधी पांडुरंग टॉकीज जवळील आनंद लॉज मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी छापा टाकून कारवाई केली होती त्यानंतर आता पुन्हा कारवाई झाल्याने देहविक्री व्यवसाय फोफावल्याचे पुढे आले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे,स.फौ.प्रदीप पाटील,अनिल पाटील,शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण,संजय भदाणे, अश्विनी जोगी,भाऊ साहेब पाटील, विनोद वितकर अशांनी मिळून केली.

Crime
Nashik Fraud Crime : कार पेटल्याचे भासवून संशयितांनी गंडविले; कार स्पार्क स्कॅम नाशिकमध्येही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com